![]()
जिल्ह्याला यंदाच्या वर्षी दुष्काळाचा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. भारतीय हवामान विभागाने सुधारित अंदाजात म्हटले की, यंदा मान्सूनदरम्यान सरासरी पावसाच्या तुलनेत पाऊस कमी होऊ शकतो. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर टांगती तलवार ठे
.
महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा हा ऊस उत्पादकासह कारखानदाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र यंदाच्या वर्षी पाऊस कमी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असताना देखील शेतकरी मोठ्या आशेने उसाच्या मेहनतीस लागला आहे. मागील वर्षी पूरस्थितीमुळे तर यंदाच्या वर्षी जर पाऊस काळ कमी झाला तर एकीकडे मेहनतीसाठी केलेला खर्च तर दुसरीकडे मागील वर्षाच्या पूरस्थितीसह उत्पादन खर्चापेक्षा उत्पादन कमी निघाल्यास शेतकरी दुहेरी अडचणीत येणार असल्याचा हवामान खात्याच्या कमी पावसाच्या अंदाजावरून शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडली आहे. तालुका ऊस क्षेत्र उ. सोलापूर ८,६२३ द. सोलापूर १०,२२९ बार्शी ३,५८२ अक्कलकोट १७,०५७ मोहोळ २३,५२६ माढा २६,७३६ करमाळा ३२,९५२ पंढरपूर ३९,३४९ सांगोला ४,०२५ माळशिरस २२,०७४ मंगळवेढा ११,२९८ एकूण क्षेत्र १,९९,४५० Share with facebook ^पावसाच्या आगमनापूर्वी ऊस मेहनत सुरू केली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर यंदा पाऊस कमी झाला, तर ऊस उत्पादनामध्ये घट होणार आहे. हवामान खात्याचा अंदाज यंदाच्या वर्षी पाऊस कमी असल्याचा आहे. मात्र पाऊस कमी होवो किंवा जास्त होवो मेहनत करणे आवश्यक आहे. मात्र यंदाच्या वर्षी डिझेल पेट्रोलचे दर वाढल्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. मात्र पाऊस कमी झाल्यास ऊस उत्पादनामध्ये घट होणार आहे. त्यामुळे उत्पादनापेक्षा उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. अभिजीत पवार, शेतकरी ^ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी लागण केलेल्या उसाची मेहनत करून रासायनिक भेसळ खताची डोस देणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे सुरक्षित पाणी आहे अशा शेतकऱ्यांनी सदर ऊसास पाणी दिले पाहिजे. त्याचबरोबर केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे, पाऊस सुरू होईल असा अंदाज आहे.शेतीत उत्तम पीक उत्पादनाचा प्रवास पेरणीपासून सुरू होतो, पण त्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे खतांचा बेसल डोस योग्य प्रकारे व योग्य वेळी दिला जाणे. – हर्षद निगडे, कृषी अधिकारी, मोहोळ
तालुकानिहाय क्षेत्र (हे.)
ऊस उत्पादनामध्ये घट