Headlines

राज्याचं पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून सुरू होणार:कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत 3 आठवड्यांच्या सत्रावर शिक्कामोर्तब




महाराष्ट्र विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनाचे सविस्तर वेळापत्रक ठरवण्यासाठी आज मुंबईत पार पडलेली ‘कामकाज सल्लागार समितीची’ महत्त्वाची बैठक आता संपली आहे. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, राज्याचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत मुंबईत होणार असल्याचे निश्चित झाले आहे. पावसाळी अधिवेशन तीन आठवडे चालणार कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आला असून, आगामी पावसाळी अधिवेशनाचे कामकाज एकूण तीन आठवडे चालणार आहे. या तीन आठवड्यांच्या कालावधीत अनेक महत्त्वाची विधेयके, जनहिताचे प्रश्न आणि शासकीय कामकाज पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राजकीय घडामोडींमुळे अधिवेशन गाजणार सध्या राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफी, आगामी निवडणुका आणि राजकीय घडामोडी पाहता हे तीन आठवड्यांचे पावसाळी अधिवेशन अत्यंत वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी केली असून, सत्ताधारी पक्ष देखील विरोधकांना चोख उत्तर देण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे २२ जूनपासून मुंबईत हायव्होल्टेज राजकीय रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचा रास्तारोको:खासदार कल्याण काळे पोलिसांच्या ताब्यात, ‘पुन्हा आंदोलन करू’चा इशारा
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. खासदार कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी संभाजीनगर-जालना महामार्गावरील केंब्रिज चौकात जोरदार ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. काँग्रेसच्या या अचानक झालेल्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून तब्बल ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर पोलिसांनी आंदोलक खासदार कल्याण काळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *