Headlines

राज्यात पावसाचा धुमाकूळ; धरणसाठे 26 टक्क्यांवर:नदी-नाले अन् ओढ्यांना पूर, जनजीवन विस्कळीत, मुंबईत ढगफुटीसारखी स्थिती




राज्यभर पावसाचा धुमाकूळ सुरूच असून रविवारी सर्वदूर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागातील नदी, नाले, ओढे, तलाव ओसंडून वाहत आहेत. काही धरणांतून विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे. यामुळे सखल भागात पाणी साठल्याने शहरी तसेच ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले आहे, तर अनेक घाट भागात अतिवृष्टी झाल्याने धबधबे ओसंडून वाहत आहेत. यामुळे राज्याच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत असून हा साठा आता २६.४२ टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात १ जुलैपासून मोसमी वारे सक्रिय झाले आहेत. त्यातच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीददरम्यान असलेला हवेचा दाब यामुळे बंगालचा उपसागर तसेच अरबी समुद्रावरून मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने वाहत आहेत. परिणामी शुक्रवार, शनिवारनंतर रविवारी लागोपाठ तिसऱ्या दिवशी राज्याला मोसमी पावसाने झोडपून काढले आहे. रविवारी या पावसाची तीव्रता अधिक होती. त्यातही कोकण गोवा, मध्य महाराष्ट्रात या पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबई, उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर तसेच पुणे आणि साताऱ्याच्या घाट भागात काही ठिकाणी अतिवृष्टी नोंदवण्यात आली. कोकणातील सर्व नद्या ओसंडून वाहत आहेत, तर मुंबईतही मुसळधार पाऊस झाल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई गोवा महामार्गही यामुळे ठप्प झाला. कोल्हापूर, सांगलीत झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यात कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. पुढील दोन दिवस पाऊस, मंगळवारनंतर तीव्रता कमीची शक्यता राज्यात पुढील दोन दिवस पावसाची तीव्रता कायम राहणार आहे. त्यातही कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत हवामान खात्याने सोमवारी रेड अलर्ट दिला आहे. मंगळवारनंतर पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसार, सोमवारी रायगड जिल्ह्यांसाठी, नाशिक-पुणे-सातारा घाट भागासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट म्हणजेच लाल इशारा जारी केला आहे. याच काळात मुंबई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हाप्पूर, नाशिक, ठाणे, पुणे या जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्येही पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळणार असून, नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इतर जिल्ह्यात ‘येलो अलर्ट देण्यात आला असून, येथे मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मुंबई : ढगफुटीसारखी स्थिती; झाड पडून दोन जणांचा मृत्यू मुंबई | मुंबईत रविवारी पावसाने हाहाकार उडवला. गेल्या २४ तासांत मुंबई शहरात २६५.६ मिमी आणि उपनगरात २२७.७ मिमी पाऊस पडला. साधारणपणे या काळात केवळ ३८ ते ३९ मिमी पाऊस अपेक्षित असतो. यादरम्यान झाड कोसळून कुर्ला व गोरेगावात दोघांचा मृत्यू झाला. कुर्ला पश्चिम येथे एका दुकानावर झाड कोसळून ६३ वर्षीय युनूस कुंडावाला यांचा मृत्यू झाला, तर गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीत एक व्यक्ती झाडाची फांदी पडून ठार झाला. या घटनेनंतर मनसेने पालिकेसमोर आंदोलन केले. यापूर्वी चेंबूरमध्ये ११ वर्षांचा विहान श्रीवास्तव आणि २ जुलै रोजी कुर्ल्यात उघड्या मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख यांचा बळी गेला होता. वांद्रे येथे मुकेश अंबानींच्या सुरक्षा ताफ्यासमोर एक झाड पडल्याने काही काळ वाहतूक थांबली. मुंबई विमानसेवा विस्कळीत, इंडिगोची ४ विमाने रद्द : पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीचे कामकाज सकाळी तासभर विस्कळीत झाल्याने इंडिगोची ४ उड्डाणे रद्द करावी लागली, तर मुंबईत येणारी १३ विमाने जवळच्या विमानतळांवर वळवली. हवामान निवळल्यानंतर ही विमाने पुन्हा मुंबईत परतली. ९० टक्के विमानांना सरासरी ६५ मिनिटांचा विलंब झाला. मुंबईत शाळा व महाविद्यालयांना सुटी : सोमवारी मुसळधार पाऊस तसेच सोसाट्याचे वारे वाहतील असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यामुळे मुंबईतील शाळा व महाविद्यालयांना सोमवारी सुटी जाहीर केली आहे. मराठवाड्यास दमदार पाऊस नाही : मराठवाड्याच्या जिल्ह्यांत पावसाने पाठ फिरवली आहे. या भागात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. विदर्भात या तुलनेत परिस्थिती बरी आहे. मात्र, या दोन्ही विभागाची दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जगबुडी नदी तुडुंब भरली राज्याच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाची तीव्रता अधिक असून राज्यातील घरणे वेगाने भरत आहेत. यामुळे अनेक धरणांतून विसर्ग केला जात आहे. पाऊस तसेच धरणांतून विसर्ग सुरू असल्याने अनेक भागांतील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे किनारी भागात खबरदारीची सूचना देण्यात आली आहे. गोसीखुर्द, हतनूर, अपर वैतरणा धरणातून रविवारी सकाळी विसर्ग करण्यात आला. पावसाच्या माऱ्यामुळे कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, जगबुडी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. रविवारी सकाळी नोंदवण्यात आलेला घाट भागातील पाऊस पुढीलप्रमाणे मिलिमीटरमध्ये : लोणावळा १७५, वनगाव १३४, शिरगाव २७५, कोयना २१०, धारावी १३५, वळवण २२९, खोपोली २८५, कुंडली १८०, भिवपुरी १५४, खंड १६५, निळशी १५३, ठोकरवाडी १२२, भिरा ३८६, डोंगरवाडी ३९८, दवडी २६८, मुळशी कॅम्प ११७. मुळशी ११२, अंबोना २४९, पोफळी २१०, ताम्हिणी ३१० मिमी मराठवाड्याकडे पावसाची पाठ



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *