![]()
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाच्या आठ खासदारांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. सकाळी साडेअकराच्या सुमारास पंतप्रधान कार्यालयात ही बैठक झाली. मतदारसंघांतील प्रलंबित विकासकामे, राज्यातील पाणीटंचाई, शेतकरी, विद्यार्थी आणि इतर लोकहिताच्या प्रश्नांवर यावेळी चर्चा झाल्याचे समजते. भेटीच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे या बैठकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. संसद भवनात INDIA आघाडीची बैठक; सुप्रिया सुळेंचा सहभाग संसदेत महाराष्ट्राच्या खासदारांचा आवाज! महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी संसदेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपापल्या मतदारसंघातील व राज्याशी संबंधित कळीचे मुद्दे लावून धरले आहेत. 1. बीडच्या पाण्याचा आणि निधीचा मुद्दा 2. नवी मुंबई विमानतळ नामकरण 3. आरोग्य, वाहतूक आणि स्थानिक प्रश्न “आम्ही लपूनछपून नव्हे, तर उघडपणे भेटत आहोत” दरम्यान, या भेटीविषयी कालच पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले होते, त्या म्हणाल्या की, ही भेट राज्यातील गंभीर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आहे. “महाराष्ट्रातील पाणीटंचाई, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही पंतप्रधान मोदींची भेट घेत आहोत. आम्ही ही भेट कोणतीही लपवाछपवी न करता, अगदी उघडपणे घेत आहोत,” असे सुळे यांनी स्पष्ट केले. ‘डिलिमिटेशन’ आणि राजकीय रणनीतीची चर्चा सुळे यांनी भेटीचे कारण राज्याचे प्रश्न असल्याचे सांगितले असले तरी, राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चा रंगल्या आहेत. आगामी काळात सरकारकडून ‘डिलिमिटेशन’ आणि महिला आरक्षणाबाबत रणनीती आखली जात असून, त्याचाच एक भाग म्हणून या भेटीकडे पाहिले जात आहे. विशेष म्हणजे, गेल्या अवघ्या 25 दिवसांत सुप्रिया सुळे यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबतची ही चौथी भेट आहे. ‘लाडकी बहीण’ योजना केवळ निवडणुकीचा स्टंट सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारच्या धोरणांवरही टीका केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जाचक अटी लादल्या जातात, मात्र दुसरीकडे ‘लाडकी बहीण’ योजनेला सवलती दिल्या जात आहेत. हा राज्य सरकारचा केवळ निवडणुकीपुरता केलेला स्टंट आहे, असा घणाघात त्यांनी केला. तसेच ‘एफसीआरए’ (FCRA) विधेयकाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, ड्रग्ज किंवा बेकायदेशीर पैशांचा प्रवाह रोखण्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे; परंतु या नावाखाली सर्वच संस्थांकडे संशयाच्या दृष्टीने पाहणे चुकीचे आहे. खासदार डिलिमिटेशनच्या विरोधातच मतदान करतील – रोहित पवार दरम्यान, या भेटीवरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर आमदार रोहित पवार यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. शरद पवार गटाचे खासदार ‘डिलिमिटेशन’च्या विरोधातच मतदान करतील, असा ठाम विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला. तसेच, आजची पंतप्रधानांसोबतची भेट ही केवळ खासदारांच्या मतदारसंघांमधील रखडलेली विकासकामे आणि जनतेच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पवार गटाच्या मोदी भेटीत आश्चर्य काय?- राऊत शरद पवार गटाचे खासदार आज पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत, यावर बोलताना राऊत म्हणाले, “देशाचे गृहमंत्री मुंबईपासून काश्मीरपर्यंत फिरतात, पण संसदेत बसत नाहीत. पंतप्रधान मोदीही संसदेत येत नाहीत. मग खासदारांना आपले प्रश्न घेऊन त्यांना भेटायला जावे लागते, यात आश्चर्य काय? हे खासदार लपूनछपून भेटत नसून रीतसर वेळ काढून भेटत आहेत.” या भेटीमुळे विरोधी पक्षाच्या प्रतिमेला तडा जातोय का? यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, “माझे सुप्रिया सुळेंशी बोलणे झाले आहे. हा पक्ष कोणत्याही परिस्थितीत ‘इंडिया’ ब्लॉकच्या विरोधात भूमिका घेणार नाही किंवा एनडीएला मदत करणार नाही. तसेच परिसीमन राष्ट्रहितासाठी योग्य नसून, शरद पवार किंवा सुप्रिया सुळे याला कधीही पाठिंबा देतील असे मला वाटत नाही.” हेही वाचा.. अर्थखात्यावर अजितदादांच्या पक्षाचाच अधिकार; पण त्यासाठी लढावे लागेल:भाजपकडून राष्ट्रवादीला दाबण्याचा प्रयत्न- रोहित पवार अमित शहा मुंबईमध्ये आले होते त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेट नाकारली, त्यामुळे अर्थखात्यासारखे महत्त्वाचे खाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल असे वाटत नाही, अर्थखात्यावर अजितदादांच्या पक्षाचा अधिकार आहे, अजित पवार नसताना भाजपकडून पक्षाची ताकद कमी करण्यात येत आहे हे आम्ही अनेकवेळा बोलून दाखवले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा
Source link
'राष्ट्रवादी' MP अन् PM यांची 25 दिवसांत चौथी भेट:सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात NCP शरद पवार गटाचे 8 खासदार मोदींना भेटले; कारण काय?