Headlines

राहुल गांधी जुमलेबाज नाहीत:सुब्रमण्यम स्वामींवर कारवाईची हिंमत का नाही?; खर्गेंवरील टीकेवरून विजय वडेट्टीवारांचा भाजपला सवाल




राहुल गांधी हे काही जुमलेबाज नाहीत. त्यांची भूमिका एकच असते ज्या भागात जातील तशी भूमिका ते बदलत नाहीत. ते काही खोटं बोलत नाही. दक्षिणेत गेल्यावर एक आणि उत्तरेत एक रंग असे काही राहुल गांधी वागत नाहीत, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. सरड्या प्रमाणे कोण रंग आणि ड्रेस बदलतात हे सर्वांना ठाऊक आहे, असे म्हणत अप्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना दहशतवाद्यांशी केली आहे. यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, त्यांच्या पक्षाच्या सुब्रमण्यम स्वामी यांनी सुद्धा हेच वक्तव्य यापूर्वी केले आहे, त्यावर भाजप उत्तर का देत नाही. आमचे अध्यक्ष मागासवर्गीय माणूस आहे ते सत्य बोलतात त्यावेळी त्यांच्याविरोधात तुम्ही तुटून पडतात. स्वामींवर कारवाई करण्याची हिंमत तुमच्यात का नाही. स्वामींवर कारवाई का नाही? विजय वडेट्टीवार म्हणाले की, सुब्रमण्यम स्वामी यांनी महिलांचा अपामन केला आहे. महिलांना संसदेत किंवा विधिमंडळात जायचे असेल तर पंतप्रधान यांच्याकडे जावे लागते इतके चुकीचे शब्द ते महिलांबद्दल बोलत आहे. त्यांच्यावर भाजप कारवाई करण्याची हिंमत का करत नाही. आणि आमचा मागासवर्गीय नेता सत्य बोलतो त्याच्यावर तुटून पडतात. हे भाजपचे लोकं संधीसाधू आहेत. ..म्हणून यांची तोंड बंद झाली विजय वडेट्टीवार म्हणाले की, काल त्या महिलेने महिलांचा आक्रोश काय असतो हे दाखवून दिले आहे. 10 ते 20 महिला गोळा करत नाराशक्तीच्या काय बोंबा मारताय. काल त्या महिलेने जो आवाज उठवला तो खरा महिलांचा आवाज होतो. त्या महिलेला समजले हे काही खरे लोकं नाही, केवळ मताच्या राजकारणासाठी हे सर्व सुरू आहे, म्हणून त्यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवला. भाजपने ज्या महिला जमा केल्या होत्या त्याचा तर आवाजही निघत नव्हता. पण त्या महिलेचा खरा आवाज होता म्हणून या सर्वांना काही बोलता आले नाही. फालतूगिरीला जनता बळी पडणार नाही विजय वडेट्टीवार म्हणाले की, महिला आरक्षणाचा आणि मंजूर न झालेल्या विधेयकाचा काहीही संबंध नव्हता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही बोलायचे नाही पण केंद्र सरकारकडून तसे लिहून आल्याने त्यांना बोलावे लागत आहे, पण वस्तुस्थिती काय आहे. नारी शक्ती वंदन नाही आणि हे लोकं चंदन लावून फिरत आहे, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे. भाजपकडून महिला आरक्षणाच्या नावाने राजकारण सुरू आहे हे जनतेला माहिती आहे.अशा फालतूगिरीला महाराष्ट्रातील जनता बळी पडणार नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *