Headlines

रोटेगाव एमआयडीसीचे 2 फलक संतप्त शेतकऱ्यांनी उखडून फेकले:संपादित जमिनींचा पूर्ण मोबदला मिळालेला नसल्याने विरोध




रोटेगाव औद्योगिक वसाहतीच्या उभारणीला वेग देण्यासाठी एमआयडीसीने भूखंड नोंदणी व मोजणीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार मोजणीसाठी नुकतेच मुंबईतील एमआयडीसीचे अधिकारी परिसरात दाखल झाले असता प्रकल्पग्रस्त शेतकरी जमा झाले. या वेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर अधिकाऱ्यांना माघारी फिरावे लागले असून शेतकऱ्यांनी रात्री एक महिन्यापूर्वी उभारलेले एमआयडीसीचे दोन फलक उखडून फेकले आहेत. १९९३ मध्ये रोटेगाव, आघूर, जरूळ आणि लोणी बुद्रुक या चार गावांमधील शेतकऱ्यांची ११७२ एकर जमीन संपादित केली होती. या क्षेत्रावर एमआयडीसीने “नियोजित जागा’ असे फलकही उभारले. मात्र, पूर्ण मोबदला अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही. रोटेगाव व जरूळ येथील काही शेतकऱ्यांनी प्रतिएकर १६ ते २५ लाख रुपये दराने निश्चित रकमेपैकी केवळ २५ टक्के रक्कम स्वीकारली, तर काही शेतकऱ्यांनी मोबदला घेतलाच नाही. त्यामुळे उर्वरित रक्कम आणि न्याय्य मोबदल्याचा प्रश्न आजही कायम आहे. विधान परिषद निवडणुक आचारसंहितेनंतर एमआयडीसी क्षेत्रातील प्लॉटिंग आणि मोजमाप प्रक्रिया सुरू होणार असल्याची चर्चा होती. मात्र त्यापूर्वीच फलक उखडून फेकण्याची घटना घडल्याने औद्योगिक वसाहतीच्या उभारणीवर प्रश्नचिन्ह आहे. कोर्टात गेलेल्या आणि न गेलेल्या दोन्ही गटातील शेतकऱ्यांचे प्रश्न अद्याप मार्गी लागले नसल्याने असंतोष कायम आहे. Ãएमआयडीसीच्या मोजणी पथकाला काही शेतकऱ्यांकडून विरोध झाला. त्यानंतर रात्री औद्योगिक वसाहतीचे दोन्ही फलक उखडून फेकण्यात आले. वैजापूर पोलिस ठाण्यात अज्ञात ावर गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे. – गणेश माउलीकर, उपअभियंता, एमआयडीसी. कोर्टात गेलेले असोत किंवा न गेलेले, दोन्ही गटातील शेतकरी आजही मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहेत. २२ वर्षे उलटूनही प्रश्न सुटत नसल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष वाढत असल्याचे लोणी-अघूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी गणेश इंगळे यांनी सांगितले. लोणी बुद्रुक व आघूर येथील ३०० एकर जमिनीचे शेतकरी न्यायालयात गेले नव्हते. या शेतकऱ्यांनी आमदार रमेश बोरनारे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बैठकीत एकरकमी मोबदल्याची मागणी केली होती. सुरुवातीला २५ लाख रुपये प्रतिएकर मागणी करण्यात आली होती. तडजोडीनंतर १५ लाख प्रतिएकर दरावर सहमतीची माहिती आहे. कोर्टात न गेलेल्यांचा प्रश्न कायम वैजापूर पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल नवीन एमआयडीसीला सुरुवात होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *