![]()
जागतिक रक्तदाता दिनानिमित्त पैठण येथील ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण पथक येथे छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विकृतीशास्त्र विभाग, विभागीय रक्त केंद्र तथा ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण पथक, पैठण यांच्या विद्यमाने विविध जनजागृतीपर उपक्रम घेण्य
.
कार्यक्रमाचे आयोजन अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी रक्तदान विषयक रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत प्रतिष्ठान महाविद्यालय, हिंद स्कॉलर स्कूल आणि आर्य चाणक्य विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास प्रतिष्ठान महाविद्यालयाचे प्राचार्य शिवानंद सोनकांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय उपअधिष्ठाता तथा विकृतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भारत सोनवणे, राज्य कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, विभागीय रक्त केंद्राच्या प्रभारी डॉ. अंजली कुलकर्णी, डॉ. गौतम सव्वाशे उपस्थित होते. यावेळी डॉ. भारत सोनवणे यांनी जागतिक रक्तदाता दिनाचे महत्त्व, रक्तदानाचे सामाजिक व वैद्यकीय फायदे तसेच रक्तदानाबाबत समाजात असलेल्या गैरसमजांवर मार्गदर्शन केले.
समाजात रक्तदानाबाबत जनजागृतीची गरज डॉ. अरविंद गायकवाड यांनी रक्तदान ही मानवतेची सेवा असल्याचे सांगत समाजात जनजागृतीची गरज व्यक्त केली. डॉ. शिवाजी सुक्रे यांनी रक्तदान जनजागृतीसाठी आयोजित उपक्रमाचे कौतुक केले. रक्तदानासारख्या कार्याबाबत सकारात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात या उपक्रमाला यश मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.