![]()
‘नीट’ प्रकरणात सीबीआय पथकाने रविवारी सकाळपासून पथकानेनिवृत्त आणि कार्यरत अशा केमिस्ट्री विषयाच्या दोन प्राध्यापकांचा शोध घेतला. मात्र, दोन्ही प्राध्यापकांची सीबीआय पथकासोबत भेट झालीनाही. हे दोन्ही प्राध्यापकमोटेगावकरचे मित्र आहेत. शनिवारी पथकाने ४ तासआरसीसीच्या कार्यालयातकागदपत्रांची पडताळणी केली.त्यानंतर दोन प्राध्यापकांचा शोधघेतला. यापैकी एक शहरातील महाविद्यालयात कार्यरत आहेत, तर दुसरे निवृत्त आहेत. पथक शहरातील इंडियानगर परिसर आणि आंबाहनुमान परिसरात गेले होते. मोटेगावकर, २ प्राध्यापकतिघे केमिस्ट्रीशी संबंधित केमिस्ट्री विषय शिकवणाराआरसीसी क्लासचा संचालकशिवराज मोटेगावकर आणि रविवारीसीबीआयचे पथक ज्या दोनप्राध्यापकांचा शोध घेत होते हे तिघेकेमेस्ट्री विषयाशी संबंधित आहेत. चौकशीसाठी पथकधडकले महाविद्यालयात दोन प्राध्यापकांच्या चौकशीसाठीपथक रविवारी शहरातील एकानामांकित महाविद्यालयात दाखलझाले. पथकाने महाविद्यालयातप्राध्यापकांचा मोबाईल नंबर आणिघराचा पत्ता मिळवला.
Source link
लातुरात मोटेगावकरच्या 2 प्राध्यापक मित्रांचा शोध:सीबीआय पथकाकडून इंडियानगर भागात चौकशी