![]()
दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवानिमित्त लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आलेल्या जळगावच्या 25 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. जयदीप मेघराज नेमाडे असे मृत तरुणाचे नाव आहे. 17 सप्टेंबर रोजी रात्री लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत उभा असताना अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले. गुदमरण्याचा त्रास होत असल्याचे त्याने मित्रांना सांगितले आणि तो रांगेतून बाहेर पडला. मात्र, काही वेळातच त्याची प्रकृती अधिक खालावली. पोलिसांनी तातडीने त्याला मदत कक्षात नेले आणि त्यानंतर रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याची प्रकृती गंभीर झाली होती. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. जयदीप हा जळगावमधील नेमाडे ट्रान्सपोर्टचे संचालक मेघराज सुभाष नेमाडे यांचा एकुलता एक मुलगा होता. जळगावमधील जीवनमोती सोसायटी, शिरसोली रोड येथे त्यांचे वास्तव्य आहे. जयदीपने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर MBAची पदवी घेतली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो पुण्यात नोकरी करत होता. मित्रांसोबत दर्शनासाठी मुंबईत आला गणेशोत्सवाच्या काळात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत येण्याची जयदीपची दरवर्षीची परंपरा होती. यंदाही तो मित्रांसोबत मुंबईत आला होता. 17 सप्टेंबरच्या रात्री तो मित्रांसह दर्शनाच्या रांगेत उभा होता. याचदरम्यान त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्याला गुदमरण्याचा त्रास होत असल्याने त्याने मित्रांना याची माहिती दिली आणि रांगेतून बाहेर पडला. जयदीपची प्रकृती खालावत असल्याचे लक्षात येताच तेथील पोलिसांनी तातडीने मदत केली. त्याला मदत कक्षात नेण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिकेच्या माध्यमातून त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर झाल्याने डॉक्टरांचे प्रयत्न निष्फळ ठरले. रात्री सुमारे 11.40 वाजता ही घटना घडली. 12 वर्षांपूर्वीच आईचे छत्र हरपले होते जयदीपच्या आईचे सुमारे 12 वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे तो कुटुंबाचा एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूने नेमाडे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. जयदीपच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवारावर शोककळा पसरली. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जयदीपचा मृतदेह जळगावला रवाना करण्यात आला. शनिवारी सकाळी 6 वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गणेशोत्सवात मित्रांसोबत आनंदाने दर्शनासाठी आलेल्या जयदीपचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांसह त्याच्या मित्रांनाही मोठा धक्का बसला आहे. हेही वाचा.. ‘हे सरकार तुमच्या दारावर टकटक करणार’:..आणि त्याची सुरुवात झाली, UPI वरील नव्या शुल्कावरून राज ठाकरेंचा केंद्रावर घणाघात उच्च-मूल्याच्या UPI व्यवहारांवर 15 ऑक्टोबर 2026 पासून नवीन मर्चंट डिस्काउंट रेट म्हणजेच MDR लागू होणार आहे. सरकारच्या या निर्णयावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील टीका केली आहे. मी गेली अनेक वर्ष सांगतोय गाफील राहू नका, हे सरकार तुमच्या दारावर टकटक करणार, आणि त्याची सुरुवात झाली असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली आहे. सविस्तर वाचा…
Source link
लालबागच्या राजाच्या दर्शनाला आला, पण घरी परतलाच नाही:दर्शनाच्या रांगेत अस्वस्थ वाटले अन् 25 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू