![]()
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सध्या अनेक नव्या घडामोडी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर दिशाचे वडील सतीश सालियन यांनी आपल्या वकिलांसह ‘मातोश्री’वर पोहोचून ठाकरेंच्या वकिलांकडे मानहानीची नोटीस सोपवली. या सर्व घडामोडींवर आता शिवसेना ठाकरे गटाचे वांद्रे पूर्व मतदारसंघाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. या प्रकरणी बोलताना वरुण सरदेसाई यांनी स्पष्ट केले की, आदित्य ठाकरे ‘त्या’ लोकांना ओळखत देखील नव्हते, हा केवळ त्यांची राजकीय प्रतिमा मलीन करण्याचा प्रकार आहे. विरोधकांना आव्हान देताना ते म्हणाले, एकतरी पुरावा आहे का तुमच्याकडे? तपासात काय ते पुढे येईल परंतु आता आदित्य ठाकरेंच्या विरोधात पुरावा आहे का? CBI चौकशी होऊ द्या काय ते पुढे येईल, असे त्यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना वरुण सरदेसाई म्हणाले, दिशा सालियान यांचे वडील सतीश सालियान यांच्याकडून फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी आरोप सुरू आहेत. प्रसिद्धी मिळवण्यासाठी ते मातोश्रीवर नोटीस देण्यासाठी येत आहेत, यामध्ये आदित्य ठाकरे यांचा काही संबंध नाही, असा ठाम विश्वास सरदेसाई यांनी व्यक्त केला आहे. तसेच मोठ्या तरुण नेत्याला बदनाम करण्यासाठी हा आरोप केला जात आहे. महायुती सरकार असताना एसआयडी च्या माध्यमातून तपास झाला होता. पोलिसांनी पाच वेळा त्यांच्या वडिलांना नोटीस देऊन जबाब नोंदवण्यासाठी बोलावले होते. ऑन ते आले नव्हते, कोर्टात 18 पानांचे सरकारने अफीडेव्हीट फाइल केले आहे. त्यामध्ये देखील आदित्य ठाकरे यांचा काही रोल नसल्याचे सांगण्यात आले आहे, अशी माहिती वरुण सरदेसाई यांनी दिली आहे. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा.. ‘कॉमन मॅन’ची ताकद दाखवून देऊ’:दिशा सालियानच्या वडिलांचा थेट ‘मातोश्री’वर मोर्चा, ठाकरेंच्या वकिलांनी अब्रूनुकसानीची नोटीस स्वीकारली दिशा सालियान मृत्यू प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक घडामोडी समोर येत असून, आता तिचे वडील सतीश सालियान यांनी आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाबाबत केलेल्या सोशल मीडिया पोस्टनंतर हे पाऊल उचलण्यात आले असून, याच दाव्याची नोटीस देण्यासाठी सतीश सालियान यांनी आज थेट ठाकरेंच्या ‘मातोश्री’ निवासस्थानावर मोर्चा काढला. सतीश सालियान हे वकिलांच्या टीमसोबत मातोश्रीच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोहोचल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांना अडवले. तसेच गेट देखील बंद करण्यात आले होते. यावेळी सालियान यांच्या वकिलांनी 500 कोटींच्या अब्रूनुकसानीची नोटीस आदित्य ठाकरे यांच्या वकिलांना दिली. वाचा सविस्तर
Source link
आदित्य ठाकरे 'त्या' लोकांना ओळखत देखील नव्हते:एकतरी पुरावा आहे का तुमच्याकडे? आमदार वरुण सरदेसाई यांचा सवाल