![]()
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 76व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जन्मगावी, गुजरातमधील वडनगर येथे भव्य ‘सेवा संकल्प अभियाना’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाची दमदार सुरुवात थेट अस्खलित गुजरातीतून करत उपस्थितांची मने जिंकली. “वडनगरनी धरतीना सपूत, देश अने दुनियाना लाडला बनी गया छे. आज आ धरती ऊपर आवीने हु बहुत गर्व अनुभवूं छूं,” अशा शब्दांत त्यांनी वडनगरच्या मातीला नमन केले. तसेच महाराष्ट्रातील 12.5 कोटी जनता, राज्य सरकार आणि शिवसेनेच्या वतीने पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. “वयाचे आकडे नाही, कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी”; एकनाथ शिंदेंकडून गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या अखंड सेवेचा संदर्भ देत एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नेतृत्वाचा गौरव केला. “मोदीजींच्या बाबतीत आम्ही वयाचे आकडे मोजत नाही, तर त्यांच्या कर्तृत्वाची उंची मोजतो. त्यांच्या कर्तृत्वाची गणना हिमालयाच्या उंचीने होते, तर जनतेप्रती त्यांचे समर्पण अरबी समुद्राच्या खोलीने मोजले जाऊ शकते.” वडनगर ते वाराणसी ऐतिहासिक प्रवास वडनगरच्या मातीतून एका सामान्य बालकाचा उमटलेला आवाज आज केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात प्रखरपणे घुमतो आहे. वडनगर ते वाराणसी हा प्रवास केवळ राजकीय नसून सेवेकडून समर्पणाकडे आणि संकल्पातून ‘विकसित भारता’च्या ध्येयाकडे जाणारी ही एक अद्भुत आणि अविस्मरणीय यात्रा आहे. एनडीएच्या (NDA) बैठकीत अमित शहा यांनी नमूद केल्याप्रमाणे, गेले 25 वर्षे मोदीजींनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून देशाची अखंड सेवा केली आहे. या पाव शतकात पदे बदलली, जबाबदाऱ्या वाढल्या, पण त्यांचा जनसेवेचा संकल्प कधीच बदलला नाही. पंतप्रधान बदलतो तेव्हा देशाचे भविष्य बदलते; 2014 नंतरचा नवा भारत पंतप्रधानांच्या जनकल्याणकारी योजनांची महती सांगताना शिंदे म्हणाले, जेव्हा देशाचा पंतप्रधान बदलतो, तेव्हा केवळ सत्ता बदलत नाही तर देशाचे भविष्य बदलते, हा चमत्कार संपूर्ण देशाने 2014 नंतर अनुभवला आहे. गरीब मातेच्या घरात पेटलेली गॅसची शेगडी, बेघरांना मिळालेले पक्के घर, सर्वसामान्यांचे बँकेत उघडलेले पहिले खाते आणि नळाने घराघरात पोहोचलेले शुद्ध पिण्याचे पाणी, हाच खऱ्या अर्थाने जनसेवेचा खरा आणि वास्तव अर्थ आहे. कागदावरच्या योजना जेव्हा थेट गरिबांच्या दारात पोहोचतात, तेव्हाच त्या यशस्वी ठरतात. १० व्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर झेप; जागतिक मंचावर भारताचा डंका भारताच्या वाढत्या आर्थिक आणि सामरिक ताकदीवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले. जगातील अनेक बलाढ्य देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना, भारताने आर्थिक आघाडीवर 10 व्या क्रमांकावरून थेट 4 थ्या क्रमांकावर ऐतिहासिक झेप घेतली आहे. लवकरच तिसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याचा देशाचा ठाम संकल्प आहे. ‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्टअप इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या मोहिमांमुळे देश वेगाने प्रगती करत आहे. पंतप्रधान मोदींचे नेतृत्व आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या कणखर मार्गदर्शनाखाली जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवून काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे जगाला दाखवून दिले. देशाच्या सुरक्षेचा प्रश्न येतो, तेव्हा शत्रू राष्ट्राच्या घरात घुसून प्रहार करण्याची ताकद आजचे भारतीय सैन्य आणि नेतृत्व ठेवते; हाच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील नवा आणि कणखर भारत आहे. आज जगातील तब्बल 36 देशांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे, हा भारतातील 140 कोटी जनतेचा सर्वोच्च सन्मान असल्याचे शिंदे यांनी नमूद केले. ————————- हेही वाचा… उबाठाचे आंदोलन नाकर्त्यांचे, आम्ही काम करणारे : जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य, जरांगेंनी उपोषण सोडल्याचा आनंद- देवेंद्र फडणवीस उबाठाचे आंदोलन हे नाकर्त्या लोकांचे आहे, आम्ही केवळ दावे न करता प्रत्यक्षात काम करणारे आहोत,” असा घणाघाती टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी बोलताना, मनोज जरांगे यांच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य केल्याचे सांगत, त्यांनी जरांगेंनी उपोषण सोडल्याबद्दल आनंद व्यक्त केला. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
वडनगरनी धरतीना सपूत, देश अने दुनियाना लाडला…:एकनाथ शिंदेंची गुजरातीतून भाषणाला सुरुवात; अमित शहांच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदींच्या कार्याचा गौरव