![]()
नीट परीक्षेतील पेपरफुटीमुळे देशातील तरुणांचे भवितव्य अंधारात आले आहे. याविरोधात दिल्लीच्या जंतरमंतरवर ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या १६ दिवसांपासून प्राणांतिक उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक बनली असून हे सरकार मात्र पूर्णपणे असंवेदनशील झाले आहे, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला, तसेच आगामी २० जुलै रोजी दिल्लीत होणाऱ्या देशव्यापी आंदोलनात भाजप खासदारांसह देशातील सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन केले. पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी सोनम वांगचुक यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणाचा दाखला दिला. ठाकरे म्हणाले, “मी काही दिवसांपूर्वी वांगचुक यांना फोन करून उपोषण सोडण्याची विनंती केली होती. या निर्दयी सरकारला तुमच्या प्राणाचे काहीही पडलेले नाही, असे मी त्यांना समजावले, पण त्यावर वांगचुक यांनी दिलेले उत्तर मनाला चटका लावणारे होते, असेही ते म्हणाले. देशात जिथे बोट दाखवू तिथे भ्रष्टाचार सुरू आहे. राष्ट्रीय पातळीवर आक्रमक प्रतिमा निर्माण करणे उद्धव ठाकरे हे ‘नीट’ पेपरफुटी आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा मुद्दा उचलून प्रादेशिकतेच्या पलीकडे जात राष्ट्रीय पातळीवर आपली नवी संवेदनशील व आक्रमक प्रतिमा निर्माण करत आहेत. तरुण मतदार आणि पालकांच्या भावनेला हात घालत त्यांनी भाजपच्या ‘राष्ट्रवादी’ प्रतिमेला थेट आव्हान दिले असून संसदेच्या अधिवेशनापूर्वी ‘इंडिया’ आघाडीची मोर्चेबांधणी मजबूत केल्याचे सांगण्यात येत आहे.
Source link
वांगचुक यांच्या उपोषणाला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा:सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन