![]()
मृग नक्षत्र सुरू होऊनही राहुरी तालुक्यात अद्याप मान्सूनचे आगमन न झाल्याने बळीराजा पुरता चिंतेत सापडला आहे. जमिनीत उष्णता असल्याने अनेक शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पाण्याची सोय असल्याने कपाशीची आगाऊ लागवड केली, त्यांच्यावर आता
.
मशागती आटोपल्या, पण कृषी विभागाचा ‘वेट अँड वॉच’चा सल्ला
तालुक्यात खरिपाच्या शेतीची मशागत होऊन तब्बल दोन आठवडे उलटले आहेत. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कृषी विभागानेही शेतकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. “जोपर्यंत पुरेसा पाऊस पडत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या किंवा लागवडी करण्याची घाई करू नये.
या आवाहनामुळे बहुतांश शेतकरी आता मान्सून सक्रिय होण्याची वाट पाहत आहेत. यंदा ‘एल निनो’च्या प्रभावाची चर्चा सुरू झाल्यापासून शेतकरी अत्यंत जपून पावले टाकत असल्याचे चित्र बाजारात आणि शिवारात दिसत आहे. सध्यातरी शेतकरी नवी लागवड करण्याऐवजी केवळ उभी पिके जगवण्याच्या प्रयत्नात आहेत.
तालुक्यातील पाणी टंचाईचे चित्र दोन वेगवेगळ्या भागांत पाहायला मिळत आहे. मुळा नदीकाठ (बागायत पट्टा) बंधारे गेल्या दोन महिन्यांपासून पूर्णपणे कोरडे आहेत. विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. पिके जगवणे कठीण झाले आहे. प्रवरा नदीकाठ नदीत पाणी सोडल्यामुळे बंधारे भरलेले आहेत. या भागातील पाण्याची अडचण तूर्तास सुटली आहे, मात्र उन्हामुळे पिके वाचवण्यासाठी कसरत सुरूच आहे. राहुरी तालुक्यात प्रामुख्याने कपाशी, उसासह चाऱ्यासाठी मका आणि घास या पिकांची लागवड केली जाते. यंदा मात्र वाढत्या कडाक्याच्या उन्हामुळे विजेची मागणी वाढली आहे. तालुक्यात विजेचा मोठा तुटवडा जाणवत आहे. शेतकऱ्यांना अधिकृतपणे केवळ ६ तास वीजपुरवठा केला जात आहे. भारनियमन (लोडशेडिंग) करण्यासाठी अनेक ठिकाणी महावितरणकडून आलटून-पालटून अख्खा दिवस ट्रान्सफॉर्मर बंद ठेवले जात आहेत. एकीकडे दिवसाआड पाणी न दिल्यास कपाशी जळून खाक होत आहे, तर दुसरीकडे विजेच्या लपंडावामुळे पाणी कसे द्यावे, या विवंचनेत शेतकरी पुरता होरपळून निघाला आहे.
कडाक्याच्या उन्हामुळे तालुक्यात विजेचीही प्रचंड मागणी वाढली