Headlines

‘विवेक भीमनवार यांचा राजीनामा झालाच नाही’:‘पेपरफुटी झाली तर नुकसानाला जबाबदार कोण?'- सुषमा अंधारे




एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. गेल्या 11 दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात पुण्यातील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला यश आले असून सरकारने विद्यार्थ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत. तसेच पेपरफुटी प्रकरणी चौकशी पूर्ण होईपर्यंत आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार हे त्या पदावर असणार नाहीत. यावर आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, महत्त्वाच्या मंगण्यांवर बोलणे झाले नाही. पेपरफुटी झाली तर कोणावर तरी कारवाई झाली पाहिजे. आयोगाने अनेक घोळ घातले आहेत. ते कोण स्वीकारणार? जे नुकसान होत आहे त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच राजीनामा झालाच नाही. विवेक भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवले असते तर त्याचे ट्विट फडणवीसांनी केले असते. पण ते ट्विट विवेक भीमनवार यांनी का केले? असा सवाल अंधारे यांनी केला आहे. शिवेंद्रराजे आणि रोहित पवारांमध्ये काय चर्चा झाली? पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणालाय, विवेक भीमनवार स्वतः हवा पालटीसाठी बाजूला गेले आहेत. विद्यार्थ्यांच्या हाती नेमके काय लागले? गुन्हे मागे घेतले आहेत हे खरे असेल तर विद्यार्थी जिथे राहतात तिथल्या घर मालकांना नोटीस का पाठवल्या? शिवेंद्रराजे आणि रोहित पवारांची भेट कधी झाली? त्यांची चर्चा काय झाली? हे माहिती नाही, असे अंधारे यांनी म्हटले आहे. आंदोलन करणारी पोरं पास झाली तर सेवेत सामावून घेतले जाईल का? विक्रम पाचपुते या एका जबाबदार व्यक्तीने विद्यार्थ्यांना अर्बन नक्षल म्हटले होते ते शब्द देखील परत घेतले नाहीत. मग हे आंदोलन यशस्वी कसे झाले. हे आंदोलन यशस्वी झाले नाही, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे. जी पोरं आंदोलनातून समोर आली, उद्या ती पोरं पास झाली तर सरकार उद्या या पोरांना सेवेत सामावून घेईल का? या पोरांना उद्या सूड बुद्धीने वागवलं जाणार नाही हे कशावरुन. पदवीधर निवडणुकीला आंदोलनाला फटका बसू नये म्हणून सरकारने तात्पुरती सारवासारव केली आहे. सरकारने विद्यार्थ्यांची फक्त दिशाभूल केली नाही तर सरकारने विद्यार्थ्यांसोबत क्रूर चेष्टा केली आहे. ही पोर सरकारला विरोध करत होती, ती पोरं सरकारच्या गोपनीय अहवालात कायमची लिहिली जातील. ही दिशाभूल आहे. रोहित पवारांनी मोठ योगदान दिलं आहे. त्यांच्या वतीने वेळ देणं महत्त्वाची गोष्ट आहे. पण या आंदोलनातून हातात काही पडलं नाही हे तेवढेच खरं असल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सुषमा अंधारेंची भूमिका दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यावरूनही वातावरण चांगलेच तापले आहे. त्यांच्यावर आक्षेप आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्यावीत, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. त्या म्हणाल्या, देशभर उद्रेक सुरू आहे. सगळे या आंदोलनात येत आहेत. मुंबईत काल मनसे नेते अमित ठाकरे आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांचे दोघांचे फोटो आणि आंदोलनाला सहभाग बघितला. गुन्हा दाखल झाला म्हणून काय फरक पडतो. वाया गेलेली केस असण्यापेक्षा अंगावर केस पडणे महत्त्वाचे. आमच्यासाठी हा महत्वाचा क्षण आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *