![]()
सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी विषारी रसायन तस्करीत मोठी कारवाई करत आणखी एका ट्रकला जप्त केले असून दोन नवीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या आंतरराज्यीय रॅकेटचे जाळे थेट तेलंगणा राज्यापर्यंत पसरले असून, राज्यस्तरीय मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. विषारी रसायनाचे ड्रम घेऊन ट्रक शिऊर बंगल्यावरून सिल्लोडमार्गे जळगावच्या दिशेने जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी भराडी फाटा येथे नाकाबंदी केली. या कारवाईत पोलिसांनी ट्रक जप्त करत शेख सरताज अली (वय ४८, रा. मेडचल, तेलंगणा) आणि मोहम्मद जाफर मोहम्मद हफीज (वय ४०, रा. महबूबनगर, तेलंगणा) या दोघांना ताब्यात घेतले. आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीवरून शिऊर बंगला परिसरामध्ये उभ्या असलेल्या दुसऱ्या ट्रकाचाही सुगावा लागला असून, तपास सुरु आहे. दोन आठवड्यांपूर्वी पोलिसांनी सुदाम ताटु, शेख तौफिक, समीरखाँ पठाण, सय्यद वसीम आणि शेख अलीम या पाच आरोपींना अटक केली होती. आता तेलंगणातील मुख्य सूत्रधारांना अटक केल्यामुळे रसायन तस्करीमागील रॅकेटचा पर्दाफाश होणार आहे. रसायन तस्करीमागील रॅकेटचा झाला पर्दाफाश
Source link
विषारी रसायनप्रकरणी 2 आरोपी, ट्रक ताब्यात:गुन्ह्यातील एकूण आरोपींची संख्या सातवर