![]()
आज सकाळी स्वयंघोषित बड्या नेत्यांनी एक PPT दाखवत आम्हीच कसे बडे आणि खरे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही कितीही मोठी PPT दाखवली तरी त्यांचा काही फायदा नाही.रोहित पवार 2023 मध्ये आमच्याकडे स्पष्ट बहुमत असल्याने तुम्ही पाठिंबा दिला. त्यावेळी त्यामध्ये सेन्सस आणि डिलिमिटेशननंतर अंमलबजावणीची अट होती, असे म्हणत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. नवनाथ बन म्हणाले की, शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये त्यांचा पक्षाला कधीही 3 अंकी आकडा मिळाला नाही. पण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही 3 वेळेस 100 च्या वर जागा जिंकल्या आहेत. शरद पवार यांना ते कधीही शक्य झाले नाही. महाराष्ट्रातील जनतेने सांगितले आहे की देवाभाऊंचा स्तर काय आहे आणि इतर नेत्यांचा काय स्तर आहे. उरला प्रश्न राऊतांच्या स्तराचा तर ते गटार गंगेमध्ये आंघोळ करतात, त्यांचा स्तर महाराष्ट्राने ओळखला आहे. महिला तुमची जागा दाखवतील नवनाथ बन म्हणाले की, मोठे PPT सादरीकरणावर दिल्यानंतर आपणच खरे हा दावा जो तुम्ही करत आहात तो खोटा आहे. रोहित पवार तुम्ही स्वयंघोषित मोठे नेते आहात. देवेंद्र फडणवीस यांनी 2023 मध्ये काय ट्विट केले होते हे नीट ऐकायला हवे. तुम्ही ते ऐकायला तयार असाल आम्ही पण असे सादरीकरण करायला तयार आहोत. आपल्या मतदारसंघात 1500 मतांनी तुम्ही निवडून आले आहात. उगाच मोठे सादरीकरण करण्यापेक्षा वास्तव काय आहे ते पहा. तुमच्या पक्षाने विरोधात मतदान केले. नारी शक्तीचा अपमान केला त्यांचे उत्तर द्यावे. नाहीतर महिला तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील. 2029 ला सुद्धा आमचाच विजय होणार नवनाथ बन म्हणाले की, 2029 मध्ये आम्ही निवडणूक जिंकणारच आहोत त्यासाठी आम्हाला अशी रणनिती करण्याची काही गरज नाही. 2019, 2024 ला आम्ही जिंकलो. 2029 ला सुद्धा आमचा विजय होणार कारण तुम्ही नारी शक्तीचा अपमान केला आहे. महिला तुम्हाला धडा शिकवेल. तुम्ही भविष्यवाणी करू नका, ती खरी ठरणार नाही. नारी शक्ती विधेयकाच्या बाबतील शरद पवारांनी काय भूमिका घेतली? तुमच्या पक्षाची काय भूमिका होती ते जनतेला सांगा.
Source link
शरद पवारांना कधीही तीन अंकी आकडा गाठता आला नाही:फडणवीसांच्या नेतृत्वात आम्ही तीनदा 100 पार, राऊत तर 'गटार गंगेत' आंघोळ करतात- नवनाथ बन