Headlines

शिवना येथे शिवमहापुराण कथेची सांगता:आज भव्य कीर्तन, महाप्रसाद




प्रतिनिधी | शिवना सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे सुरु असलेल्या असलेल्या शिवमहापुराण कथेची सांगता सोमवारी भव्य कीर्तन व महप्रसादाने होणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील प्रख्यात प्रवचनकार जयवंत महाराज नांदेडकर यांच्या वाणीतून कथा श्रवण करताना भाविक मंत्र मुग्ध झाले होते. सांगता सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सोमवारी दुपारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध युवा कीर्तनकार अंबादास महाराज लोखंडे पारधकर यांची विशेष कीर्तन सेवा होणार आहे. तसेच संगीत विशारद रमेश महाराज सोनवणे व प्रभाकर महाराज सपकाळ यांच्या सुरेल संगीत साथीने धार्मिक कार्यक्रमाची शोभा अधिक वाढणार आहे. कीर्तन सेवेची सांगता झाल्यानंतर सर्व भाविकांसाठी भव्य महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *