![]()
शेततळ्यात साचलेले पाणी पाहण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय शाळकरी मुलाचा पाय घसरला. तो खोल पाण्यात पडला. त्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना खुलताबाद तालुक्यातील धामणगाव तांडा येथे सोमवारी दुपारी घडली. मयुर प्रभू राठोड असे मृत विद्
.
सोमवारी दुपारी मयूर हा आपल्या चार ते पाच मित्रांसोबत गावालगतच्या डोंगर परिसरात करवंदे खाण्यासाठी गेला होता. उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे सर्व मुले खेळण्यासाठी आणि फिरण्यासाठी डोंगरात गेली होती. त्याच परिसरात मयूरचे आजोबा देवू राठोड बकऱ्या चारण्यासाठी गेले होते. उन्हाचा कडाका वाढला. आजोबा देवू राठोड यांनी नातवाला आणि त्याच्या मित्रांना घरी परत जाण्याचा सल्ला दिला. आजोबांचे ऐकून मयूर मित्रांसोबत डोंगरावरून खाली उतरला. तो घराच्या दिशेने निघाला. घरी परतत असताना रस्त्यात एका शेतकऱ्याचे शेत लागते. त्या शेतात पावसाचे पाणी साठवण्यासाठी मोठे शेततळे करण्यात आले आहे. याच वेळी अचानक मयूरचा तोल गेला. तो थेट खोल पाण्यात कोसळला. मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही.
गावकरी घटनास्थळी धावून आले. गावकऱ्यांनी मयूरचा शोध घेतला. त्याला पाण्याबाहेर काढण्यात आले. त्याला तातडीने खुलताबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. वंदना गायसमुद्रे यांनी तपासणी केली. त्यांनी