![]()
वरुड पिंप्री सिल्लोड तालुक्यातील बहुली, चिंचपुर, हट्टी परिसरात शेतकऱ्यांनी ३० ते ४० टक्के क्षेत्रावर मिरचीची लागवड केली आहे. मका, कापूस, सोयाबीनसह इतर मालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा कल मिरची लागवडीकडे वाढला आहे. मिरची लागवडीसाठी एकरी ३० ते ४० हजार रुपये खर्च येतो. वार्षिक उत्पन्नातील पूर्ण पैसे शेतकऱ्यांनी मिरचीमध्ये टाकले आहेत. मिरचीमुळे चांगले दिवस येतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. पुढील काळात अस्मानी संकटाचा सामना करावा लागेल, अशी भीतीही आहे. गारपिटीतून पीक वाचेल की नाही, याची शाश्वती नाही. बहुली गावात पिण्याच्या पाण्याची मोठी कसरत सुरू असतानाही शेतकरी टँकरने पाणी विकत घेऊन मिरचीला देत आहेत. बहुली परिसरात ३० ते ४०% मिरचीची लागवड करण्यात आली. भविष्याची पर्वा न करता मिरचीची लागवड Ãसरकार मालाला हमीभाव देत नाही. हमीभाव मिळाला तर बँक किंवा सावकाराकडे हात पसरावा लागणार नाही. काळजावर दगड ठेवून, भविष्याची पर्वा न करता शेतकरी मिरची लागवडीकडे वळला आहे. मिरची तारते की मारते, हे येत्या काळात दिसेल. – स्वप्निल देविदास डवणे, शेतकरी, बहुली
Source link
बहुली परिसरात 40 टक्के शेतात मिरचीची लागवड