Headlines

शेतात विजेच्या धक्क्याने 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू:वडिलांच्या डोळ्यासमोर घडली घटना, चिंचोली बुद्रुक गावात दुःखाचे वातावरण




अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोली बुद्रुक येथे २५ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली. संकेत मनोहर मुरे (वय २५, रा. चिंचोली बुद्रुक) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो वडिलांसोबत शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेला होता. शेतातील इलेक्ट्रिक केबल बाजूला करत असताना, वीजप्रवाह असलेली केबल अचानक संकेतच्या अंगावर पडली. त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि तो केबलच्या संपर्कात अडकला. मुलाला धक्का लागल्याचे पाहून वडील मनोहर मुरे यांनी बांबूने त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला. संपर्क सुटत नसल्याने त्यांनी तात्काळ वीजपुरवठा बंद करण्यासाठी डीपीकडे धाव घेतली. तोपर्यंत संकेतचा मृत्यू झाला होता. मुलाचा डोळ्यासमोर मृत्यू झाल्याने वडिलांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. चिंचोली बुद्रुक गावात दुःखाचे वातावरण आहे. ग्रामस्थांनी वीज यंत्रणेची तपासणी आणि धोकादायक केबल दुरुस्त करण्याची मागणी केली. बाधित कुटुंबांना आर्थिक मदत देण्याचीही मागणी त्यांनी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *