Headlines

शेतीतील एआय तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन:कृषिदूतांकडून शासनाने विकसित केलेल्या विविध कृषिविषयक मोबाइल ॲप्सची माहिती‎



वाढता उत्पादन खर्च, बदलते हवामान, शेतीतील नवी आव्हाने लक्षात घेता आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे ही काळाची गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत रांगनाथ महाराज कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांनी मंठा ता

.

कार्यक्रमात कृषीदूतांनी महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाने विकसित केलेल्या विविध कृषीविषयक मोबाईल ॲप्सची माहिती दिली. हवामानाचा अचूक अंदाज, पीक नियोजन, कीड व रोग व्यवस्थापन, माती परीक्षण, बाजारभाव, खत व्यवस्थापन, शासकीय योजनांची माहिती मोबाईलवर सहज उपलब्ध होत असल्याचे सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पिकांवरील रोगांची प्राथमिक ओळख शक्य असल्याचेही सांगितले. उत्पादन वाढीसाठी योग्य सल्ला, सिंचन नियोजन, आधुनिक शेती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येते, हे प्रात्यक्षिकासह स्पष्ट केले. यावेळी शेतकऱ्यांनी मोबाईल ॲप्सच्या वापराबाबत विविध प्रश्न विचारले. कृषीदूतांनी त्यांच्या शंका दूर केल्या. बदलत्या काळानुसार डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास उत्पादन खर्च कमी होईल. शेती अधिक फायदेशीर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. व्ही. डी. पाटील, प्रा. एन. टी. जाधव, एस. डी. गडदे, के. के. शिंदे, एस. डी. राऊत आणि एस. टी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत आनंद पऱ्हाड, शिवप्रसाद बारगजे, राजेश्वर बर्डे, जयेश चेके, सुजल खुणे, वैभव नन्नावरे, गोरख कोरडे, महेश एखंडे, अजय जोशी आदींनी सहभाग नोंदविला.

डिजिटल तंत्रज्ञानामुळे शेती होणार अधिक सक्षम आजच्या स्पर्धात्मक आणि हवामान बदलाच्या परिस्थितीत शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक बनले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि शासनाने विकसित केलेल्या कृषी मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज, पीकनिहाय सल्ला, कीड व रोग व्यवस्थापन, माती परीक्षण, बाजारभाव तसेच विविध शासकीय योजनांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. या डिजिटल सुविधांचा प्रभावी वापर केल्यास उत्पादन खर्च कमी करण्याबरोबरच शेती उत्पादन आणि गुणवत्तेत वाढ होऊ शकते. त्यामुळे बदलत्या काळानुसार प्रत्येक शेतकऱ्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून स्मार्ट शेतीकडे वाटचाल करावी, असे आवाहन कृषीदूतांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *