![]()
दोन गँगमधील जुन्या वादातून एका युवकावर श्रीरामपूर शहरात प्राणघातक हल्ला झाल्याची घटना गुरुवारी दुपारी पूर्णवादनगर भागामध्ये घडली. शुभम उर्फ कल्लू यादव असे जखमी युवकाचे नाव असून यावेळी गोळीबार झाल्याची चर्चाही सुरू आहे. या प्रकरणी सागर मधुकर होगे 22) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम यादव व अभय उर्फ अभी सुरेश ससाणे (रा. आझाद वाडी, बेलापूर) यांच्यामध्ये जुने वाद आहेत. सागर होगे सकाळी घरी जात असताना त्यांना मित्र शुभम यादव भेटला. ते त्याच्यासोबत बोलत असताना अभय ससाणे हा साथीदारांसह तेथे आला. त्यांनी शुभम यादव याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. जखमी यादव याला सुरुवातीला साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथून अहिल्यानगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. दरम्यान, ससाणे याने गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याचा आरोप यादव याने केला आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक चेतन लोखंडे करत आहेत. बंगल्यात आश्रय घेतल्याने वाचला ससाणे व यादव यांच्या गटात जुने वाद आहेत. त्यातूनच हा हल्ला झाला. काही महिन्यांपूर्वी सूतगिरणी परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेतून हा वाद वाढल्याचे सांगितले जात आहे. तसेच, हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत यादव जीव वाचवण्यासाठी जवळच असलेल्या मुळा-प्रवरा रस्त्यावरील एका बंगल्यात शिरला. त्याने घराचा दरवाजा आतून बंद करून घेतला. त्यामुळे त्याचा जीव वाचला. सुरक्षा रक्षकावर कोयत्याने हल्ला अहिल्यानगरमध्ये दुसऱ्सा एका घटनेत रागाने पाहिल्याच्या कारणावरून झालेल्या जुन्या वादाचा राग मनात धरून एका सुरक्षा रक्षकावर कोयता आणि बांबूने हल्ला केल्याची घटना भिंगार रोडवरील नगर क्लब जवळील फुटबॉल मैदानावर घडली. या प्रकरणी जखमी सुरक्षा रक्षक उदय अब्राहम ढगे (वय 21, रा. शांतीनगर केदारवस्ती,सोलापूर रोड, ) याने दिलेल्या फिर्यादीवरून निलेश शिंदे (रा. भिंगार, )व इतर चार अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.
Source link
श्रीरामपूरमध्ये पुन्हा गँगवार:जुन्या वादातून एकावर धारदार शस्त्राने वार, हल्लेखोराने गोळीबार केल्याचाही आरोप, गुन्हा दाखल