Headlines

श्री पांडुरंगाच्या नगरीमध्ये पोहोचली रुक्मिणी माता:पंढरपूर येथील मठात मातेच्या पालखीचे स्वागत‎




विठू माऊलीला भेटण्याच्या ओढीने १९ जूनला पायी वारीद्वारे माहेर श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथून निघालेल्या रुक्मिणी माता बुधवारी २२ जुलैला पंढरपुरात पोहोचल्या. ही परंपरा गेल्या ४३२ वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहे. रुक्मिणी मातेची पालखी पंढरपुरातील रुक्मिणी मठात दरवर्षी प्रथम विश्रांती घेते. त्यानंतर युगानुयुगे विटेवर उभ्या श्री हरि पांडुरंगाच्या भेटीला आषाढी एकादशीला पोहोचते. माता रुक्मिणी व श्री विठ्ठलाच्या भेटीचा हा सोहळा अवर्णनीय असतो. तिर्थक्षेत्र कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानाची कौंडण्यपूर ते पंढरपूर आषाढी पायी दिंडी पंढरपूर येथील रुक्मिणी मठात पोहोचल्यानंतर माता रुक्मिणी यांच्या पालखीचे भक्तिभावासह चैतन्यमयी वातावरणात स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी, फुलांचा वर्षाव, रुक्मिणी मातेचा जयघोष, वारकऱ्यांचे औषण, प्रसाद वितरण असा या स्वागताचा थाट होता. रुक्मिणी मातेच्या पालखी सोहळ्याला १९ जूनला कौंडण्यपूर येथून सुरुवात झाली होती. त्यानंतर ३३ दिवस पायी वारी करून ही पालखी बुधवारी २२ जुलैला श्री क्षेत्र पंढरपूर येथील रुक्मिणी मठात दुपारी १२ वाजता पोहोचली. पालखीचे स्वागत करण्यासाठी मठातील रुक्मिणी मंदिराची सजावट करून रांगोळ्यांसह ते फुलांनी सुशोभित केले होते. श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानाचे विश्वस्त हिम्मत टाकोने व अशोक पवार, अकोला येथील रवींद्र अंधारे यांच्या उपस्थितीत स्वागत दिंडी प्रमुख, संस्थानचे सचिव सदानंद साधू, दिंडी चालक पंकज महाराज महल्ले, दिंडी प्रमुख सुरेश चव्हाण (विश्वस्त) विणेकरी विठोबा बागडे व वारकरी यांचे स्वागत केले. या कार्यक्रमास मारडा येथील सेवावृत्त मुख्याध्यापिका, वारकरी शांता दोंडगे, कुसूम पवार, सेवावृत्त पीएसआय प्रल्हाद पवार, सुर्यकांत पवार, बाबूलाल मोरे, वारकरी महिला, पुरुष यांच्या सहभागाने पंढरपूरातील आई रुक्मिणी मठा समोर आल्याने फटाके फोडून स्वागत केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *