Headlines

श्री ​वटवृक्ष मंदिरात स्वामींचा पुण्यतिथी उत्सव‎:सायंकाळी 5.30 ते रात्री 10 या वेळेत श्रींची पालखी मिरवणूक निघेल




“स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी अक्कलकोटमध्ये धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी असेल. सुमारे लाखभर भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता लक्षात घेऊन सुलभ दर्शनासाठी यंदा विशेष रांगेची व उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन दर्शन रांगेत छताची व्यवस्था केली आहे. मंदिरातील गर्दी टाळण्यासाठी वैयक्तिक अभिषेक बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतल्याचे चेअरमन महेश इंगळे यांनी सांगितले. पहाटेची काकड आरती, नाम वीणा सप्ताह समाप्ती आणि दुपारी राजघराण्याकडून होणारी महानैवेद्य आरती हे या दिवसाचे मुख्य आकर्षण असणार आहे. रात्री १० या वेळेत श्रींचा सजवलेला सवाद्य पालखी मिरवणूक सोहळा मंदिरातून निघेल. . पुण्यतिथी दिनी पहाटे २ वाजता पुरोहित मंदार महाराज पुजारी व पुरोहित व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते श्रींची काकड आरती. पहाटे २.३० ते ४ या वेळेत नगर प्रदक्षिणा. त्यानंतर अक्कलकोट राजघराण्याचा व सकाळी ६ वाजता देवस्थानच्या वतीने श्रींना पारंपारिक लघु रुद्र अभिषेक. सकाळी ७ वाजता सत्संग महिला भजनी मंडळाच्या भजनाने देवस्थानच्या ज्योती मंडपात नाम वीणा सप्ताह समाप्ती होईल. . सकाळी ११ वाजता महानैवेद्य आरती पुरोहित मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते होईल. दुपारी १२ वा. अक्कलकोट राजघराण्याचे श्रीमंत मालोजीराजे भोसले राजासाहेब यांच्या वतीने श्रींची आरती करून महानैवेद्य. दुपारी १२ ते ३ या वेळेत मंदिराच्या पुर्वेकडील उपहारगृहात भक्तांना भोजन महाप्रसाद. सायंकाळी ५.३० ते रात्री १० या वेळेत श्रींचा पालखी मिरवणूक निघेल. मैंदर्गी रोड अन्नछत्र मंडळ प्रांगण, कमलाराजे चौक, मल्लिकार्जुन मंदिर बस स्थानक समाधी मठ, हत्ती तलाव परिसर, विरक्त मठ परिसर येथे पोलिस निरीक्षक यांनी पार्किंग सोय केली. .वटवृक्ष मंदिर समितीतर्फे दक्षिण महाद्वारालगत बॅरेकेटींगची सोय. .उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी दर्शन रांगेत कापडी मंडप उभारणार. .पहाटे दोन वाजल्यापासून दर्शन,अर्धा ते दोन तासात दर्शन होऊ शकेल. .एसटी महामंडळाकडून १० अतिरिक्त बस फेऱ्यांची सोय केली. .मुरलीधर मंदिराच्या ठिकाणी तहसीलचे कंट्रोल युनिट असेल. .एसटी बसेसचे पार्किंग शहरा बाहेर करण्याची व्यवस्था केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *