Headlines

संगारेड्डी येथे भीषण अपघात:नांदेडच्या एका कुटुंबातील तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी




तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात मंगळवारी पहाटे सुमारे ४ वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वर झालेल्या भीषण अपघातात नांदेड शहरातील एका कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेमुळे नांदेड शहरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड येथील बागबान कॉलनी, मस्जिद कुबा गल्ली परिसरातील एक कुटुंब कारने हैदराबाद विमानतळाकडे जात होते. संगारेड्डी जिल्ह्यातील बचूपल्ली परिसरात अचानक एक दुचाकी कारसमोर आल्याने तिला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे कारवरील नियंत्रण सुटून ती अनेक वेळा पलटी झाली. त्यानंतर कार दुभाजकावर आदळून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडली. या भीषण अपघातात मौलाना मोहम्मद नदीम, त्यांची आई शमीमा बेगम आणि चार वर्षांची मुलगी अनाबिया तस्कीन यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे धाकटे बंधू नविद गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारमधील इतर प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, उमराह करून सौदी अरेबियातून हैदराबाद विमानतळावर पोहोचणाऱ्या आपल्या नातेवाईकांना घेण्यासाठी हे कुटुंब नांदेडहून निघाले होते. मात्र, संगारेड्डी जिल्ह्यातील बचूपल्ली परिसरात काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि आनंदाच्या भेटीचा प्रवास दुर्दैवी दुर्घटनेत बदलला. या घटनेची माहिती मिळताच नांदेड शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, मृतांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *