![]()
राज्यातील तापमान वाढत आहे. विशेषत विदर्भात पारा चांगलाच तापला आहे. गेल्या काही दिवसांपासून उच्चांकी असलेल्या भुसावळचे तापमान मंगळवारी ४५.८ अंशांवर होते. सकाळी सात वाजेपासूनच गरम वारे वाहत असल्याने जिवाची काहिली होत आहे. ही स्थिती सध्या तरी बदलणार नाही. राज्यातील १४ जिल्ह्यांना पुढील तीन दिवसांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत मंगळवारी कमाल तापमान ३४.८ अंश सेल्सिअस नोंदवलं गेले. बुधवारी ते सरासरी ३७ अंश सेल्सिअसवर राहण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत राज्याच्या तापमानात ४ ते ६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विदर्भातील अनेक भागांमध्ये पारा पुन्हा ४५ ते ४६ अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ शकतो. महाराष्ट्रात सध्या उष्णतेची लाट कशामुळे आहे? हवामान तज्ज्ञांनुसार महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची मुख्य कारणे अशी. वायव्येकडून येणारे उष्ण वारे : राजस्थान, गुजरात आणि पाकिस्तानच्या कोरड्या व वाळवंटी भागातून अतिशय उष्ण आणि कोरडे वारे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाकडे वाहत आहेत. सांगली जिल्ह्यात भिंतअंगावर कोसळून ६ ठार सांगली | जत तालुक्यात मंगळवारी मोटेवाडी या गावात देवीची यात्रा सुरू होती. याच वेळी वादळाला सुरुवात झाली. आश्रयासाठी ज्या भिंतीचा भाविकांनी आधार घेतला, तीच अंगावर कोसळून ६ जणांचा करुण अंत झाला. शंकर लोखंडे, मंगल मोठे, संजूबाई चौधरी (सर्व रा. पाडोझरी), कोंडिबा गेजगे (रा. दरीबडची) आणि इतर दोन भाविकांचा मृतांत समावेश आहे. दोघांची ओळख पटलेली नाही. यलो अलर्ट असलेले जिल्हे १३ मे : धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती.
१४ मे : जळगाव , नाशिक, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, वर्धा.
१५ मे : छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, वर्धा.
१६ मे : अकोला व अमरावती.
Source link
संभाजीनगर 43.6 अंश:राज्यातील 14 जिल्ह्यांना आजपासून 4 दिवस उष्णतेचा यलो अलर्ट