![]()
समृद्धी महामार्गावर राहुरीच्या तरुण उद्योजकाला अडवून लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा मुख्य सूत्रधार परशुराम गायकवाड व त्याच्या चार साथीदारांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. तब्बल ५ जिल्ह्यांत हवा असलेला आणि एमपीडीएमध्ये फरार असलेला परशुराम स्वतःच्या गाड्यां
.
लुटमारीनंतर गाड्यांच्या ॲक्सेसरीज व सेकंड हँड गाड्या खरेदी करण्यासाठी तो थेट दिल्लीच्या ऑटोमोबाइल मार्केटमध्ये पोहोचला होता, तेथेच एलसीबीने त्याच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईत २४ वर्षीय परशुराम गायकवाड व करण जाधवला दिल्लीतून, तर किरण गायकवाड, अनिल जाधव (एक्सयूव्ही ७०० सह) व पंडित ऊर्फ चन्ना अप्पा लष्करेला अनुक्रमे बीड, सोलापूर रोड व येवलातून अटक केली.
छोले-भटुरे खाताना झडप
लोकेशन मिळताच एलसीबीचे विशेष पथक दिल्लीला रवाना झाले. परशुराम व त्याचा साथीदार छोले-भटुरे खात बसले असताना साध्या वेशातील पोलिसांनी वेढा घालून झडप मारली.
एका सिमकार्डने अडकला
पोलिसांना चकवा देण्यासाठी परशुराम स्वतःचा मोबाइल वापरत नसे. लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून तो ऑनलाइन व्यवहार टाळून रोख रक्कम बाळगायचा आणि संपर्कासाठी इतरांचे ‘वायफाय’ वापरायचा. महिनाभरापूर्वी त्याने नातेवाइकाच्या नावाने घेतलेले नवीन सिमकार्ड दिल्लीत सुरू केले. याच चुकीमुळे सायबर पोलिसांना त्याचे लाइव्ह लोकेशन मिळाले.