![]()
नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे शनिवारी मध्यरात्रीअज्ञात चोरट्यांनी एकाच परिसरातील सात घरे फोडूनरोख रक्कम व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लाखोरुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटनाघडली. पाच वर्षांपूर्वी याच भागात झालेल्याघरफोड्यांच्या मालिकेची ही पुनरावृत्ती मानली जातअसून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माहितीनुसार, उन्हाळ्यामुळे अनेक कुटुंबीय घरांनाकुलूप लावून गच्चीवर झोपले होते. याच संधीचा फायदाघेत चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी श्रीराममंदिरालगतच्या रोहिदास गल्लीतील देवबा ठाकरे,विजय ठाकरे, चिंधा ठाकरे तसेच राजवाडापरिसरातील व्यंकट निकम, कल्याबाई निकम, विजय निकमयांच्या घरांचे कडी-कोयंडे तोडूनघरफोडी केली. तसेच हेमंत निकमयांच्या घराच्या मागील बाजूचीखिडकी काढून घरात प्रवेशकरण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र घरातील सदस्य जागे असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनीतेथून पळ काढला. देवबा ठाकरेआणि विजय ठाकरे सकाळी घरातआले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. बाहेरगावी गेलेले इतर घरमालक घरीपरतल्यानंतर त्यांच्या घरांतील रोख रक्कम व दागिने चोरीला गेल्याचेसमोर आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दुपारीश्वानपथकानेही घटनास्थळी भेट देततपासासाठी सुगावा घेतला.याप्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यातअज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हादाखल करण्यात आला असूनपुढील तपास सुरू आहे. पाच वर्षांनंतर पुन्हाघरफोड्यांची मालिका साकोरा येथे पाच वर्षांच्या अंतरानेपुन्हा एकाच परिसरातील अनेकघरांवर घरफोड्यांची मालिकाघडल्याने ग्रामीण भागातीलसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.पूर्वीच्या घरफोडीतील आरोपीअद्याप सापडले नसताना नव्यानेसात घरे फोडली गेल्यानेपोलिसांच्या तपास आणिप्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रश्नउपस्थित होत आहेत. घरातील कपाट उचलून नेले शेतात चोरट्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर काही वस्तू व कपाटे त्यांना खोलता आली नाहीत. त्यामुळे चोरट्यांनी घरातील कपाटे थेट उचलून शेतात नेली वदगडाने फोडून त्यातील सुमारे ५० हजार रुपये रोख रक्कम तसेचसोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याचे उघड झाले. मार्कंडेय पर्वतावर सुरक्षेसाठी तैनात बंदोबस्त कळवण | तालुक्यातील प्रसिद्ध मार्कंडेय पर्वतावर सोमवती अमावस्येनिमित्तभरविण्यात येणारी मार्कंडेय ऋषी यात्रा सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यातआली असून भाविकांना पर्वतावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. कश्मिरा संखे यांनी यासंदर्भात आदेश जारी केलेअसून भाविकांसाठी पहिल्या पायरीवर दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
Source link
साकोऱ्यात रात्रीत 7 घरफोड्या, लाखोंचा ऐवज लंपास:पाच वर्षांनंतर पुन्हा घरफोड्यांची मालिका