Headlines

सिल्लोडमध्ये ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजना शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी:शेतकऱ्याने मागवला विहिरीचा पंप, कंपनीने पाठवला बोअरवेलचा पंप‎




सरकारने सुरू केलेली मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. पानवडोद येथील शेतकरी रामभाऊ नामदेव गावंडे यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत विहिरीतील पंपाची नोंद केली होती. पण सोलार कंपनीने त्यांना बोअरवेलचा पंप पॅनलसह वर्षभरापूर्वी पाठवला. पंप बदलून मिळावा यासाठी शेतकरी महावितरण व कंत्राटदार यांच्याकडे वारंवार चकरा मारून थकले आहेत. तुमचे काम आज होईल, उद्या होईल या उत्तरांमुळे त्यांच्या शेतातील उन्हाळी मिरचीची लागवड राहून गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. पाणवडोद येथील शेतकरी रामभाऊ नामदेव गावंडे यांची शिवना शिवारात माळरानावर जमीन आहे. विहिरीच्या पंपाऐवजी आलेला बोअरवेलचा पंप. काय आहे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांना सिंचनासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ १० टक्के रक्कम भरून सोलार पॅनल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच मिळतो. अनुसूचित जातीसाठी ५ टक्के रक्कम भरावी लागते. उर्वरित रक्कमेचे केंद्र व राज्य सरकार अनुदान देते. पाच वर्षांची दुरुस्ती हमी मिळते. इन्शुरन्सही मिळतो. वीज बिल नाही. लोडशेडिंगची चिंता नाही. सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा होतो. नेहमीच्या वीज समस्येला कंटाळून त्यांनी गेल्या वर्षी ७ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्र कंपनीकडे ऑनलाइन अर्ज करून ३२ हजार ७५ रुपये भरले होते. त्यात त्यांनी सात्त्विक ग्रीन एनर्जी कंपनीचा पाच अश्वशक्तीचा सौर पंप निवडला. काही दिवसांनी त्यांच्या शेतात सोलार पॅनलचे सर्व साहित्य येऊन पडले खरे. पण विहिरीतील पंपाऐवजी बोअरवेलचा पंप आल्याने ते साहित्य तसेच उन्हात धु॰ळ खात पडून राहिले. कडक उन्हामुळे ते साहित्य खराब झाल्यास जबाबदारी कोण घेईल, हा प्रश्न त्यांना आता सतावत आहे. याप्रकरणी शेतकऱ्याकडे असलेल्या सात्त्विक कंपनीच्या कामगार गणेश रोडगे यांना संपर्क केला असता त्याने, आम्ही कंपनी सोडली, कंपनी सहकार्य करत नाही, बऱ्याच लोकांच्या तक्रारी आहेत, असे सांगितले. या समस्येचे लवकरात लवकर निवारण करावे अशी शेतकरी रामभाऊ गावंडे यांनी व्यक्त केली. सरकारच्या योजनेवर विश्वास ठेऊन फसलो साहेब, नोंद विहिरीतील पंपाची पाठवली, पण मला बोअरवेलची मोटार आली. ती विहिरीत कशी टाकायची, वर्ष झाले अर्ज-विनंत्या, फोन करतोय. अधिकारी म्हणतात बदलून देऊ थोडं थांबा पण कोणीच येत नाही. सरकारच्या योजनेवर विश्वास ठेवून मीच फसलो. -रामभाऊ गावंडे, शेतकरी पाणवडोद



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *