Headlines

सिल्लोड येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम:प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांसमोर उलगडले चमत्कारांचे वैज्ञानिक सत्य‎



येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात समाज कल्याण विभागाच्या वतीने ‘महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व निर्मूलन कायद्या’अंतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष

.

मुख्याध्यापक निशांत मस्के यांनी हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रमेश काळे यांनी केले, तर आभार रमेश सोनवणे यांनी मानले. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी लक्ष्मण कोलोड, नरेशसिंग राजपूत, भिकन आगारे, सुनील तांबे, रमेश परदेशी, भास्कर सागरे यांनी परिश्रम घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *