![]()
सरकारच्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेत ठेकेदारांकडून शेतकरी आणि महावितरण कंपनीची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. लाभार्थी शेतकऱ्याच्या शेतात प्रत्यक्षात सौर पंप न बसवताच, दुसऱ्याच ठिकाणचे आणि दुसऱ्या शेतकऱ्याचे बोगस छायाचित्र महावितरणच्या अधिकृत पोर्टलवर अपलोड करून ठेकेदार कंपनी शासनाचे लाखो रुपयांचे अनुदान लाटत असल्याचे उघड झाले. सौर कृषी पंपासाठी शेतकऱ्यांना ९० ते ९५ टक्के अनुदान मिळते. कृषी पंप मंजूर होण्यापूर्वी खुल्या प्रवर्गासाठी १० टक्के, तर राखीव प्रवर्गासाठी ५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना जमा करावी लागते. त्यानंतर पंपाला मंजुरी मिळते. पंप बसवल्यानंतर शासन उर्वरित रक्कम थेट ठेकेदारांच्या बँक खात्यावर जमा करते. याच प्रक्रियेचा फायदा घेत, ठेकेदार दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतात बसवलेल्या पंपाचे व शेतकऱ्याचे फोटो अपलोड करतात. दरम्यान, याबाबत संबंधित कंपनीच्या मॅनेजरशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही पंचनामा केल्याने बनवेगिरी उघड शेतात पंप न बसवता पोर्टवर बसवल्याचे दाखवले. शेतकऱ्याने महावितरणाकडे तक्रार केली. महावितरणने घटनास्थळ पंचनामा केला. प्रत्यक्षात पंप बसवलेला नसल्याचे समोर आले. ठेकेदाराने खोटा अहवाल सादर केल्याचा प्रकार महावितरणाने समोर आणला. असे उचलले जाते अनुदान एका ओळखीच्या शेतकऱ्याच्या शेतात बसवलेल्या पंपाचे आणि शेतकऱ्याचे फोटो घेतले जातात.तेच फोटो इतर शेतकऱ्याचे दाखवून पोर्टलवर अपलोड करून पंप बसवल्याचा अहवाल सादर केला जातो. त्याआधारे अनुदान उचलले जाते. केस 1 : सौर पंपासाठी ३२ हजार भरले
शेतकरी: अशोक थोरात, गाव : घोडेगाव, ता.गंगापूर
थोरात यांनी नोव्हेंबर २०२५ रोजी सौर कृषी पंपासाठी अर्ज केला होता. त्यांनी १० % हिस्सा म्हणून ३२ हजार भरले. त्यासाठी त्यांनी मावशीचे सोने गहाण ठेवून पैसे उभे केले होते. मार्च-एप्रिल २०२६ दरम्यान साहित्य शेतात आणून ठेवले गेले. मात्र, प्रत्यक्षात पंप बसवला नाही. ठेकेदाराने महावितरणच्या पोर्टलवर पंप बसवल्याची खोटी कागदपत्रे करून पंप बसवल्याचे दाखवले. केस 2 : दुसऱ्याचाच फोटो अपलोड केला शेतकरी : विक्रम वाबळे , गाव : बोलेगाव, ता.गंगापूर वाबळे यांनी २० जून २०२५ रोजी ५ एचपी पंपासाठी अर्ज केला. त्यांना पंप मंजूर झाला. ठेकेदाराने साहित्य शेतात आणून ठेवले. मात्र, ठेकेदाराने पंप न बसवता महावितरणच्या पोर्टलवर दुसऱ्याच शेतकऱ्याच्या पंपाचा फोटो अपलोड करून पंप बसवल्याचे दखवले. महावितरणने घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यात प्रत्यक्ष पंप बसवण्यात आला नसल्याचे आढळून आले. माझ्या शेतात पंप अद्याप बसवला नाही माझ्या शेतात अद्यापही पंप बसवलेला नाही. परंतु, मी पोर्टलवर तपासले असता माझ्या शेतात पंप बसवल्याचे व त्यासाठी दुसऱ्याच शेतकऱ्याचा फोटो वापरत दाखवले आहे. – विक्रम वाबळे, लाभार्थी शेतकरी, बोलेगाव ठेकेदाराने बनावट अहवाल दिला शेतात पंप न बसवता पोर्टलवर पंप बसवल्याचे तक्रार शेतकऱ्याने केली होती. या प्रकरणाची चौकशी केली असता ठेकेदाराने खोटा अहवाल सादर केल्याचा प्रकार समोर आला. – अरविंद काळे, उपकार्यकारी अभियंता, गंगापूर
Source link
सोने गहाण ठेवून शेतकऱ्याने भरला सौरपंपासाठी हिस्सा:पंप न बसवता ठेकेदार लुटताहेत अनुदान, शेतकऱ्यांसह महावितरणची ठेकेदाराकडून फसवणूक