Headlines

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गांवरील अपघातप्रवण ठिकाणांची केली पाहणी:वळणांवर सुरक्षा उपाय वाढवा; अधीक्षक डॉ. रूपाली दरेकर यांचे निर्देश‎



पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या अपघातांचा धोका लक्षात घेऊन महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलिस अधीक्षक डॉ. रूपाली दरेकर यांनी गुरुवारी सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील वाहतूक कोंडी आणि अपघातप्रवण ठिकाणांची पाहणी

.

पावसाळ्यात पुलांजवळ आणि सर्व्हिस रोडवर वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने अपघातांची शक्यता वाढते. याची गंभीर दखल घेत डॉ. दरेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत विविध स्थळांची पाहणी करत आवश्यक सुरक्षा उपाय तत्काळ राबविण्याचे निर्देश दिले. विशेषतः अपूर्ण पुलांची कामे विलंब न लावता पूर्ण करावीत, वाहतुकीतील अडथळे दूर करावेत, तसेच धोकादायक वळणांवर दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर्स, बॅरिकेड्स आणि सुरक्षिततेची साधने उपलब्ध करून द्यावीत, असे त्यांनी सांगितले. यावेळी पोलिस उपाधीक्षक हाके, ग्रामीण वाहतूक शाखेचे निरीक्षक आनंद झोटे, सहाय्यक निरीक्षक विद्या झिरपे, उपनिरीक्षक नितेश इंद्रोले, गौतम थोरात, भीमलाल राठोड, बाबुराव जाधव, सागर पाटील, राजू संपाळ, अभिजित गायकवाड, जारवाल, शरद दळवी शांताराम सोनवणे उपस्थित होते.

नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन देवगाव फाटा, अतिथी हॉटेलसमोरील परिसर, गल्लेबोरगाव तसेच कसाबखेडा फाटा येथील सर्व्हिस रोडची पाहणी करण्यात आली. अपघात किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ महामार्ग पोलिस केंद्र, खुलताबाद किंवा आपत्कालीन सेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *