Headlines

सौंदाणेत रामदेव बाबा मंदिरात चोरी:5.5 किलो दागिने व रोकड लंपास, मागील दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश, पंचक्रोशीत संताप‎




श्री रामदेवजी बाबा मंदिरात रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास १२ लाख रुपयांची धाडसी चोरी झाली. कडेकोट सुरक्षा आणि सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असतानाही चोरट्यांनी मंदिराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून ५.५ किलो चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली. चोरट्यांचा हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे पंचक्रोशीत तीव्र संताप व्यक्त होत असून, चोरांना तत्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मंदिराचे सचिव शरद कुमावत आणि पुजारी रात्री १२ वाजता मंदिर परिसरात झोपले होते. याचाच फायदा घेत दोन चोरट्यांनी मंदिराच्या मागील प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. मुख्य दानपेटी अत्यंत जड असल्याने ती उचलणे चोरट्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी पेटीची कुलूपे तोडली. चोरटे तासभर मंदिरात चोरी करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. रामदेव बाबा मंदिरातील दानपेटी. नेहमीप्रमाणे पहाटे ५ वाजता पूजेसाठी आलेले पुजारी राधेश्याम महाराज यांना मंदिराच्या मागील गेटचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी तत्काळ शरद पेंटर (बागोरे) यांना जागे केले. चोरी झाल्याचे समजताच देवस्थानचे अध्यक्ष नीलेश कर्नावट, मनोज पवार, दादासाहेब पवार, यशवंत कुमावत यांनी मंदिरात धाव घेतली व मालेगाव तालुका पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावंत, हवालदार तुषार अहिरे, आवारे आणि पोलिस पाटील श्रावण खैरणार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. चोरांचा माग काढण्यासाठी तातडीने हस्तरेषातज्ज्ञ कांबळे, अमोल गांगुर्डे, हरीश माळी आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *