![]()
येथील महानगरपालिकेत सत्ता स्थापन करून १५० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त ‘शहर सुधार आघाडी””ने अकोला शहराच्या विकासाचा लेखाजोखा शनिवारी (दि.४) पत्रकार परिषदेत मांडला. आमदार रणधीरभाऊ सावरकर, पालकमंत्री आकाश फुंडकर व खासदार अनुप धोत्रे यांच्या संयुक्त प्रयत्नातून शहरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लागली आहे. भविष्यातील योजनांची घोषणा यावेळी करण्यात आली. याप्रसंगी आ. रणधीर सावरकर, खा. अनुप धोत्रे, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, महापौर शारदा खेडकर, भाजपचे मनपा गटनेते अश्विन नवले, जयंत मसने, सुनील मेश्राम व शहर सुधार आघाडीचे सदस्य उपस्थित होते. स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी स्पष्ट केले की, शहरातील ‘ओपन स्पेस’ वाटपात कोणताही घोटाळा झालेला नाही. ओपन स्पेस ही कोणाच्याही खासगी मालकीची होत नाही व ती महापालिकेच्या मालकीचीही नसते, तर ती केवळ संबंधित भागातील नागरिकांच्या वापरासाठी व देखभालीसाठी असते. महापालिकेने महिनाभरापूर्वी घेतलेल्या ठरावानुसार, शहरातील सर्व ओपन स्पेस नागरिकांसाठी खुल्या केल्या जाणार आहेत. न्यायालयाच्या निर्णयानुसार महापालिका या जागा कोणालाही मालकी हक्काने देऊ शकत नाही. { उर्वरित पान ४ शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेने नवीन ‘ए-टू-झेड’ कचरा व्यवस्थापन प्रणाली लागू केली आहे. या अंतर्गत एकाच एजन्सीकडे घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे, शहरातील ४ संकलन केंद्रांवर तो जमा करणे व तिथून ‘भोड’ येथील मुख्य प्रोसेसिंग युनिटपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. भोड युनिटमध्ये दररोज जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खत तयार केले जाईल, त्याला शेतकऱ्यांकडून मोठी मागणी आहे. यासाठी महापालिका कंत्राटदाराला ५० वाहने देणार आहे. उर्वरित वाहने कंत्राटदाराला स्वतःच्या नावावर नोंदणीकृत करून वापरावी लागणार आहेत. अकोल्याचा पाणीप्रश्न कायमचा सोडवण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रयत्नातून जिगाव प्रकल्पातून पाण्याचे आरक्षण मिळवून २२५ कोटींचा निधी प्राप्त झाला. अमृत योजनेंतर्गत जिगाव ते निमकर्दा येथे पाणी आणण्यासाठी २१७ कोटींची योजना आहे. उर्वरित ७५० कोटींच्या निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे. योजनेंतर्गत अकोला शहराच्या मूळ भागातील जुनी पाइपलाइन तशीच ठेवून, केवळ हद्दवाढ भागात नवीन पाइपलाइन टाकली जाईल. निमकर्दा येथे पिण्याच्या पाण्याच्या नवीन टाक्या बांधून पाणी साठवण व शुद्धीकरण (फिल्टर) केले जाईल. येत्या दीड ते दोन वर्षांत अकोला शहर व हद्दवाढ भागात दररोज पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच शहरात दोन टप्प्यांत भूमिगत गटार योजनेचे कामही सुरू झाले आहे. मनपाच्या ७ शाळा करणार डिजिटल मनपाच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा व भौतिक सुविधा सुधारण्यासाठी ‘बाळासाहेब ठाकरे योजने’अंतर्गत पहिल्या टप्प्यात अधिक विद्यार्थी असलेल्या मनपाच्या ७ मराठी शाळांची निवड आधुनिकीकरण, डिजिटायझेशनसाठी करण्यात आली आहे. तसेच, अधिक पटसंख्येच्या उर्दू शाळांच्या विकासासाठी अल्पसंख्याक निधीचा वापर केला जात आहे. या योजनेंतर्गत शाळा डिजिटल करण्यासह विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी, अद्ययावत स्वच्छतागृहांची सुविधा पुरवली जाणार आहे. कचऱ्यातून होणार आता खत निर्मिती
Source link
हद्दवाढीमध्ये दररोज पाणी; कचऱ्यातून खतनिर्मिती अन् 15 ऑगस्टपासून बस:शहर सुधार आघाडीकडून 150 दिवसांचा लेखाजोखा सादर