Headlines

सामाजिक दायित्व:जि.प.तील 260 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे केले वितरण, कस्तुरीची "वारी शिक्षणाची'' वंचितांच्या दारी




आर्थिकदृष्ट्या दुर्बल व आदिवासी बहुल भागातील जि. प. प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या वंचित व उपेक्षित विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सामाजिक संस्था “कस्तुरी’ने राबवलेल्या “वारी शिक्षणाची’ हा सेवाभावी उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण करीत सामाजिक दायित्व निभावले. अकोट तालुक्यातील जनुना व वस्तापूर या असणाऱ्या गावात भेटी देऊन तेथील जि. प. प्राथमिक शाळेत वर्ग १ते ८ मध्ये शिकणाऱ्या २६० विद्यार्थ्यांना १ लाख २५ हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील शाळांची चालू सत्राची घंटा मंगळवार ३० जूनला वाजली. अनेक खासगी शाळा, कॉन्व्हेंटमधील विद्यार्थ्यांना महागडे, दर्जेदार शैक्षणिक साहित्य पालकांनी दिले. मात्र दुर्गम भागातील अनेक गावातील ही विषमता लक्षात घेऊन कस्तुरी संस्थेने सामाजिक दायित्वाच्या भावनेतून दुर्गम भागातील असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शालेय साहित्य िवतरणाचा उपक्रम राबवला. माजी शिक्षक आमदार वसंतराव खोटरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमास आकोटचे गटशिक्षणाधिकारी मधुकर सूर्यवंशी, कस्तुरीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. ॲड. किशोर बुटोले, सदस्य घनश्याम चांडक, उद्योजक कमलकिशोर हरितवाल यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. याप्रसंगी वारी शिक्षणाची या प्रकल्पाचे प्रमुख संजय गायकवाड, प्रा.ॲड.किशोर बुटोले यांनी कस्तुरीच्या प्रकल्पाविषयी आणि सेवाकार्याविषयी भूमिका मांडली. विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, पेन, पेन्सिल, रबर, शार्पनर, स्केल, लेटर बुक, लाँग बुक, छत्री व पाणी बॉटल इत्यादींचा समावेश होता. गटशिक्षणाधिकारी सूर्यवंशी, मुख्याध्यापिका बबिता सोळंके (जनुना), मुख्याध्यापक संजय साळुंखे (वस्तापूर) यांनी कस्तुरीच्या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक करून कस्तुरी विषयी कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन प्राजक्ता चोपडे, मनोज दुधे यांनी केले. यशस्वीतेसाठी संजय गायकवाड (प्रकल्प प्रमुख), घनश्याम चांडक, धीरज चांडक, संजय बुटोले, संजय ठाकरे, नरेंद्र देवघरे, मीरा वानखडे, ज्योती सुलताने, नानासाहेब मोहोड, प्रा. प्रभाकर पाटील, अनिल पालवे, संगीता जोध, किशोर बांधवकर, अतुल कुलकर्णी, दामोदर नूपे, विष्णू चोरे, सचिन मोडक, आनंद शर्मा, मनोहर महल्ले, प्रकाश धवने, ज्योत्स्ना जोशी, मंगला सिडाम, रघुनाथ माळवे, इरफान यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेतील विद्यार्थ्यांनी व गावातील आदिवासी बांधवांनी लेझीम पथक व आदिवासी परंपरेचे दर्शन घडवत नृत्य सादर केले. संपूर्ण कस्तुरी टीमचे औक्षण करून आणि उत्साहात स्वागत केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे पूजन, मालार्पण आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. विविध संघटनांनी नोंदवला सहभाग शहरातील सेवाभावी संस्था स्व. अथर्व अनिल मुळे मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक प्रा. अनिल मुळे, प्रा. सीमा मुळे, कृष्णार्पण प्रतिष्ठानच्या संस्थापिका छाया देशमुख यांनी देखील कस्तुरीच्या सेवाभावी कार्यात सहभाग नोंदवला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *