Headlines

Government sorghum procurement center closed; Protest at tehsil office, many sorghum left at home, payments for purchased sorghum pending



येथील शासकीय ज्वारी खरेदी केंद्र बंद पडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पुढारी तथा नगरपंचायतीचे गटनेते प्रकाश मारोटकर व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष समीर दहातोंडे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर धडक दिली. बंद पडलेले खरेदी केंद्र त

.

खासगी बाजारपेठेत ज्वारी पिकाला कवडीमोल भाव असल्याने शासनाने हमीभाव देऊन पंधरा दिवसांपूर्वी येथे ज्वारी खरेदीचे शासकीय केंद्र सुरु केले होते. खासगी आणि शासकीय खरेदीदरात प्रती क्विंटल सुमारे ९०० रूपयांची तफावत असल्याने ४०० चे वर शेतकऱ्यांनी नाफेडकडे ऑनलाईन नोंदणी केली आहे. शासनाच्या आदेशान्वये स्थानिक खरेदी विक्री संघाने ज्वारीची खरेदी करून ९५ शेतकऱ्यांचे धान्य शासकीय गोडावूनला जमा केले. मात्र काही दिवसानंतर ते बंद करण्यात आले. त्यामुळे इतर शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे.

दरम्यान केंद्र बंद पडल्याने शेतकरी सैरभैर झाले आहे. ज्यांनी ज्वारी विकली, त्यांना अद्याप पैसे मिळाले नाहीत आणि ज्यांनी नोंदणी केली, त्यांची ज्वारी खरेदी करण्याची कोणतीच तारीखही ठरली नाही. शेतकऱ्यांच्या माहितीनुसार काही राजकीय पदाधिकाऱ्यांच्या आपसातील हेवेदाव्यांमुळे असे घडले आहे. त्या पदाधिकाऱ्यांनी खोटी तक्रार नोंदवून ज्वारी खरेदी केंद्र बंद करविले आहे. ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांच्या मते तलाठी व कृषी सहायक आता आमच्या पिकांची पाहणी करायला येत आहेत. मुळात २०२५ मधील पिकाची पाहणी २०२६ मध्ये दिसणार कशी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ज्वारीचे पिक निघून आता तीन महिन्याचा कालावधी झाला आहे, त्यामुळे शासनाने वरातीमागून घोडे हाकलणे बंद करावे व तात्काळ खरेदी केंद्र सुरू करून खरेदी केलेल्या मालाचे चुकारे द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी प्रकाश मारोटकर यांच्यासह शिवसेना शहरप्रमुख निलेश इखार, काँग्रेसचे सुमीत दहातोंडे, मोरेश्वर दिवटे, सुनील इंझळकर, जय ठाकरे, अंकुश बोदडे, शाम पाठक, अंबादास कुडू, अनिल ठाकरे, प्रदीप कदम, देवीदास मानके सचिन बोरकर, सोमेश्वर रंगे, गजानन ढेरे, सागर खंडार, दिलीप कोहळे, ओम ठाकरे, ज्ञानेश्वर सरोदे, विशाल काळे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. नांदगाव तालुक्यात ज्वारीचा पेरा नसतानाही खरेदी केंद्रावर एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्वारीची खरेदी कशी काय होत आहे, असा प्रश्न काही पुढाऱ्यांनी उपस्थित केला आहे. तक्रारदारांच्या मते ही ज्वारी व्यापाऱ्यांची आहे. तशी तक्रार तहसिलदार व जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. या तक्रारीनंतर तहसिलदारांनी कृषी सहाय्यक व तलाठी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून व ७/१२ तपासणी करून अहवाल सादर करण्यात यावा, असे पत्र दिले. या पत्राच्या अनुषंगाने जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी तहसिलदारांचा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय खरेदी केंद्र सुरू करू नये व आतापर्यंत खरेदी केलेल्या मालाचे चुकारे देऊ नये असे लेखी आदेश खरेदी विक्री संघाला दिले आहे.

म्हणून बंद आहे खरेदी; अहवाल सादर करावा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *