Headlines

आषाढीत पहिल्यांदाच ‘एअर ॲम्बुलन्स'ची सुविधा:आरोग्यमंत्री आबिटकर यांनी घेतला आढावा, वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी 3097 डॉक्टरांचे पथक तैनात‎




प्रतिनिधी | पंढरपूर आषाढी यात्रा कालावधीत गर्दीतून वारकरी भाविकांना आरोग्य सुविधा तात्काळ मिळाव्यात यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका, बाईक ॲम्बुलन्सचा वापर करण्यात येतो. यावर्षीपासून अत्यावश्यक रुग्णांकरिता एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे, तसेच यंदा यात्रा काळात आरोग्य विभागाकडून ३ हजार ९७ डॉक्टरांचे पथक कार्यरत राहणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर वारकरी भाविकांना पालखी मार्ग व तळांवर देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार समाधान आवताडे, आमदार राजू खरे, आमदार अभिजीत पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, नगराध्यक्षा प्रणिता भालके, पंचायत समिती सभापती शुभम आगवणे उपस्थित होते. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, वारकरी वारीसाठी घरातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा घरी पोहोचेपर्यंत आरोग्याच्या सर्व आवश्यक सुविधा पुरवण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. त्या नियोजनाप्रमाणे सर्व सेवा पुरवाव्यात. वारी कालावधीत भाविकांना डिजिटल आरोग्य सुविधा देण्यात येणार आहेत. वारकरी भाविकांना आरोग्य सुविधा पुरवताना कोणतीही उणीव राहू नये. वारी कालावधीत आरोग्य सुविधा देण्यासाठी पंढरपूर येथील स्थानिक डॉक्टरांची उपलब्धता राहण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी स्वतंत्र बैठक घेऊन त्यांना सूचना द्याव्यात. पालखी मार्गावरील खासगी वैद्यकीय रुग्णालयांतील दहा टक्के खाटा आरक्षित करण्यात येणार आहेत. यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार राजू खरे, आमदार अभिजीत पाटील, नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी विविध प्रकारच्या सूचना केल्या. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी पीपीटीद्वारे वारी कालावधीत भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली. . आयसीयू व आपला दवाखाना: पालखी मार्गावर वारकरी, भाविकांसाठी ४३ ठिकाणी सुसज्ज आयसीयूची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच प्राथमिक उपचारांसाठी १५६ ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ वारकरी भक्तांसाठी उभारण्यात येणार आहेत. . रुग्णवाहिका आणि फिरते दूत: २१५ फिरते आरोग्य दूत नेमण्यात येणार आहेत. एकूण ३५३ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर दिंडी प्रमुखांना प्राथमिक औषधोपचार किटचे वाटप . . शहरातील व्यवस्था: पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांमध्ये १६ ठिकाणी सुसज्ज आयसीयू कक्ष व १७ ठिकाणी तात्पुरते ‘आपला दवाखाना’ सुरू राहणार आहेत. अशी असणार यंत्रणा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *