![]()
जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या कर्ज पुनर्वित्त मोहिमेत अमरावती जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाधिकारी यांच्या पुढाकाराने जिल्हा प्रशासनाने नियोजनबद्ध प्रयत्न केले. बँकांच्या समन्वित सहभागामुळ
.
राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत अमरावती जिल्ह्याची कामगिरी लक्षणीय आहे. येत्या काही दिवसांत ती शंभर टक्क्यांवर पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कृषी कर्जवाटपाच्या बाबतीतही अमरावती जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. जिल्ह्याने निर्धारित उद्दिष्टाच्या ८१ टक्के कृषी कर्जवाटप पूर्ण केले आहे. राज्याची सरासरी ५२ टक्के आहे. राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यांमध्ये अमरावती जिल्ह्याने अग्रस्थान प्राप्त केले आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी वेळोवेळी बँक प्रतिनिधी व संबंधित यंत्रणांच्या बैठका घेतल्या. कर्ज पुनर्वित्त व पीक कर्जवाटपाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेतला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यक निर्देश देण्यात आले. बँकनिहाय कामगिरीचा पाठपुरावा करण्यात आला. प्रशासकीय समन्वयावर विशेष भर देण्यात आला. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मोहिमेला गती मिळाली. जिल्ह्याला राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पालकमंत्री यांच्या हस्ते बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या पाच बँकांच्या अधिकाऱ्यांचा गौरवही करण्यात आला. शिवाय उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रमाणपत्र देऊन काही अधिकाऱ्यांनाही गौरविण्यात आले.
यामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया, भंडारज शाखेचे शाखा व्यवस्थापक महेंद्र सपकाळ, बँक ऑफ महाराष्ट्र, लोणी टाकळी शाखेचे शाखा व्यवस्थापक प्रफुल्ल शेंडे आणि स्टेट बँक ऑफ इंडिया, अंजनगाव सुर्जी शाखेचे शाखा व्यवस्थापक सचिन कासबे यांचा समावेश आहे.
इतर जिल्ह्यांची स्थिती अशी कर्ज पुनर्वित्ताच्या बाबतीत महाराष्ट्रातील इतर जिल्हे बरेच मागे आहेत. अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्यात ३३ टक्के, धुळे व अकोला जिल्ह्यांत प्रत्येकी ३१ टक्के, यवतमाळ जिल्ह्यात २१ टक्के, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १८ टक्के, तर जालना जिल्ह्यात केवळ १४ टक्के कर्ज पुनर्वित्ताची नोंद झाली आहे. बँकांच्या समन्वित सहभागामुळेही मोहिमेला उल्लेखनीय यश मिळाले आहे. जिल्ह्याची कर्ज पुनर्वित्ताची प्रगती ऑक्टोबरअखेर ५५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.