Headlines

आयुर्वेदच्या 53 विद्यार्थ्यांचा दीक्षांत सोहळा:डॉ. वंदनाताई ढोणे ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयातील सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती




आरोग्य क्षेत्राला नवी दिशा व तरुण तज्ज्ञांचे बळ मिळवून देणारा महत्त्वाचा क्षण नुकताच पातूर येथे पार पडला. येथील डॉ. वंदनाताई जगन्नाथराव ढोणे ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयात दीक्षांत समारंभ प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या सोहळ्यात बीएएमएस वैद्यकीय अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या ५३ विद्यार्थ्यांना अधिकृतरीत्या पदवी प्रदान करण्यात आली. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान संस्थेचे डॉ. आनंद वेदप्रकाश पाटील यांनी भूषविले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री धनेश्वरी मानव विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. उदयसिंह पाटील उपस्थित होते, तर विशेष पाहुणे म्हणून खामगावचे उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पोरी व अकोल्याचे अपर पोलिस अधीक्षक डॉ. निलेश पांडे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शनात मान्यवर म्हणाले की, भारत हा प्राचीन वैद्यकीय परंपरा असलेला देश आहे. आधुनिक युगात आयुर्वेदाचे महत्त्व जागतिक स्तरावर वेगाने वाढत असून नवोदित डॉक्टरांनी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड घेत पारंपरिक आयुर्वेद चिकित्सेचा प्रसार करावा. महाविद्यालय संचालक डॉ. साजिद आर. शेख यांनी विद्यार्थ्यांचे हे यश पालक व शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे फलित असल्याचे सांगत हे ५३ डॉक्टर भविष्यात आरोग्यसेवेचा चेहरामोहरा बदलतील, असा विश्वास व्यक्त केला. तर प्राचार्य डॉ. अभय भुस्कडे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील नैतिक मूल्ये, सातत्यपूर्ण ज्ञानार्जनावर भर दिला. विद्यार्थी व पालकांच्या चेहऱ्यावर अभिमानाचा आनंद ओसंडून वाहत होता. ग्रामीण भागात आरोग्यसेवा देणे हीच खरी कसोटी “आरोग्य क्षेत्रात मानवकल्याण साधण्याची अमूल्य संधी आहे. ग्रामीण भागातील दुर्बल घटकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळवून देणे ही प्रत्येक डॉक्टरची प्राथमिक सामाजिक जबाबदारी आहे. रुग्णांच्या वेदना दूर करून त्यांना निरोगी आयुष्य देणे हीच खरी ईश्वरसेवा आहे,’ असा सल्ला श्री मंडळाचे अध्यक्ष डॉ. उदयसिंह पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *