Headlines

आतषबाजी महागल्यामुळे फटाका बाजारपेठेत 10 कोटींची उलाढाल:सल्फर, कच्च्या मालामुळे 25 टक्क्यांनी वाढलेल्या किंमतीचा फटका




दिवाळीचा सण जवळ येताच अकोल्यातील फटाका बाजारात खरेदीची लगबग वाढली आहे. यंदा बाजारात पारंपरिक फुलबाझी, चकरी, अनार, रॉकेट आणि लडी यांच्यासोबतच आकर्षक रंगांची उधळण करणारे मल्टी कलर शॉट्स, आकाशात वेगवेगळ्या आकृत्या तयार करणारे एरियल फॅन्सी फटाके, कलर फाउंटन, म्युझिकल रॉकेट आणि फिरत्या चाकांसारखे स्पिनिंग व्हील अशा नव्या प्रकारांची भर पडली आहे. विशेष म्हणजे महागडे असलेल्या प्रीमियम पॅकिंग फटाक्यांची खरेदी वाढली आहे. शहरात फटाक्यांच्या खरेदीमधून ८ ते १० कोटींची उलाढाल होण्याचा अंदाज व्यापारी वर्गाचा असून, यंदा किंमतीही २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दक्षिण भारतातील शिवकाशी हे फटाका उत्पादनाचे प्रमुख केंद्र असून, तेथून अकोल्यातील मोठे व्यावसायिक दिवाळीच्या महिनाभर आधीच मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आयात करतात. मोठ्या व्यावसायिकांकडून शहरातील किरकोळ दुकानदार खरेदी करतात. मार्केटमध्ये कॅटलॉगमध्ये १०० ते १५० हून अधिक फटाक्याचे पर्याय आणि नवीन व्हरायटींची उपलब्धता आहे. यामध्ये स्पार्कलर्स, ग्राउंड चकरी, फ्लॉवर पॉट्स, रॉकेट्स, मल्टिशॉट्स, कलर फाउंटन, एरियल फॅन्सी आणि गिफ्ट बॉक्स यांचा समावेश आहे. आकाशात एकामागून एक रंगीत गोळे सोडणारे मल्टि कलर शॉट्स, जमिनीवर रंगीत ठिणग्यांची उधळण करणारे फाउंटन आणि प्रकाश निर्माण करणारे व्हील अशा प्रकारच्या फटाक्यांना मागणी वाढली आहे. याशिवाय लहान मुलांसाठी आकर्षक फटाके उपलब्ध आहेत. १५ सेंमी स्पार्कलर्स १०० प्रति बॉक्स १५ सेंमी पेन्सिल ८० प्रति बॉक्स २ साउंड रॉकेट २०० प्रति बॉक्स म्युझिकल रॉकेट १५० प्रति बॉक्स ७ शॉट्स मल्टी कलर ३०० प्रति बॉक्स १२ शॉट्स मल्टी कलर ५०० प्रति बॉक्स ३० शॉट्स मल्टी कलर ७०० प्रति बॉक्स ६० शॉट्स मल्टी कलर ९०० प्रति बॉक्स मिनी फॅमिली कॉम्बो ३,६०० सल्फर, कच्चा मालाचे वाढलेले दर अडचणीचे फटाकेसाठी आवश्यक कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली आहे. सल्फरची किंमत प्रतिकिलो ७५ रुपयांवरून वाढून १४० रुपयांपर्यंत पोहोचली होती. त्यानंतर दरात घसरण होऊन सल्फरची किंमत प्रतिकिलो सुमारे १०० रुपयांवर आली आहे. अॅल्युमिनियम, सोडियम नायट्रेट आणि कच्च्या मालाच्या किमतीतही सुमारे ३० टक्क्यांनी वाढ झाल्याने फटाक्यांच्या किंमतीत वाढ तरीही प्रतिसाद ^यंदा फटाक्यांमध्ये मल्टि कलर शॉट्स, कलर फाउंटन, एरियल फॅन्सी आणि विविध प्रकारच्या स्पार्कलर्सचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. ग्राहक आपल्या बजेटनुसार फटाके निवडत आहेत. लहान मुलांसाठी कमी आवाजाचे फटाक्यांचे पर्याय आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत किमतींत वाढ झाली आहे. मात्र, ग्राहकांचा खरेदीला प्रतिसाद मिळत आहे. -आमिर, फटाका व्यवसायिक, अकोला अशा फटाक्यांच्या किंमती



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *