![]()
एकीकडे दुष्काळजन्य परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह समाजातील विविध घटकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे असताना सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीची जाणीव जपत गरजवंतांच्या मदतीसाठी पुढे येणारे हात समाजात विश्वास निर्माण करतात. याच भावनेतून आवताडे परिवाराकडून गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसाठी एक महिन्याचे धान्य देण्यात आले. सिद्धेश्वर आवताडे यांनी आनंद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता समाजातील गरजू, निराधार आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात समाधान निर्माण करण्यासाठी खर्ची घालणे, हीच खरी सामाजिक संवेदनशीलता आहे. याच विचारातून आवताडे परिवाराने वृद्धाश्रमातील आजी-आजोबांच्या महिनाभराच्या अन्नधान्याची जबाबदारी स्वीकारत महिन्याचा शिधा वाटप करण्यात आला. या प्रसंगी वृद्धाश्रमाचे पवार यांच्या हस्ते सिद्धेश्वर आवताडे यांना वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. या वेळी त्यांनी आवताडे परिवाराच्या सामाजिक योगदानाविषयी एक महत्त्वपूर्ण आणि भावनिक माहिती सांगितली. कृषी उद्योग संघाचे चेअरमन शैलेश आवताडे म्हणाले, दुष्काळजन्य परिस्थितीत वृद्धाश्रमातील वडीलधाऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत लागली, तर आवताडे परिवार ती पूर्ण करण्यासाठी सदैव तत्पर राहील. वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू किंवा अन्य कोणत्याही स्वरूपातील मदतीची गरज भासल्यास परिवार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असे आश्वासन त्यांनी दिले. या वेळी दामाजी ग्रामपंचायतीचे सरपंच जमीर सुतार, अंकुश पवार, बबलू माने, सिद्धनाथ कांबळे, शंभर नागणे, बाबा जाधव, समाधान लेंडेवे आदी मान्यवर उपस्थित होते. सिद्धेश्वर आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त धान्य वाटप करण्यात आले. आपुलकी अन् जिव्हाळ्यामुळे परिवार आमचाच वाटतो आवताडे परिवाराकडून मातोश्री वृद्धाश्रमाला दर महिन्याला नियमितपणे न चुकता ५,००० रुपयांची देणगी दिली जाते. गतवर्षी सुनंदा आवताडे यांनीही वाढदिवसानिमित्त या वृद्धाश्रमात साडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या आठवणींना उजाळा देताना पवार काका भावूक झाले. आवताडे परिवाराकडून सातत्याने मिळणारी आर्थिक मदत, आपुलकी आणि जिव्हाळा पाहता हा परिवार आम्हाला परका वाटत नाही, भावना त्यांनी व्यक्त केली.
Source link
गोपाळपूरच्या वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसाठी शिधा:आवताडे परिवाराचा स्तुत्य उपक्रम, दर महिन्याला दिली जाते रुपये 5000 रक्कम