![]()
माळीवाडा वेशीतील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीचे भूमिपूजन होऊन वर्षाहून अधिक काळ लोटला, तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. महापुरुषांच्या पुतळ्यांच्या उभारणीची घोषणा आणि भूमिपूजनापुरतीच प्रशासनाची तत्
.
पुतळ्यांची उभारणी आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी अतिक्रमणे हटविणे गरजेचे आहे. याबाबत यापूर्वीही महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला; मात्र ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आता आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष अतिक्रमण हटवून काम सुरू करावे, अशी मागणी आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.महापौर ज्योती गाडे, उपमहापौर अॅड. धनंजय जाधव, स्थायी समिती सभापती सुभाष लोंढे आणि आयुक्त डांगे यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करत दिवाळीनंतर अतिक्रमणे हटवण्याचे व पुतळा उभारणीचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. मात्र, मुदतीत कार्यवाही न झाल्यास आंदोलन अटळ असल्याचे समितीने स्पष्ट केले. यावेळी प्रा. माणिक विधाते, किशोर डागवाले, अनिल बोरुडे, अशोक कानडे, बाळासाहेब भुजबळ, पंडित खरपुडे, ज्ञानेश्वर रासकर, बजरंग भुतारे, अमोल भांबरकर, अनिल इंवळे, अॅड. सुनील सूर्यवंशी आदी उपस्थित होते. महापौर ज्योती गाडे यांना निवेदन देताना प्रा. माणिक विधाते. समवेत किशोर डागवाले, अनिल बोरुडे, अशोक कानडे, बाळासाहेब भुजबळ, पंडित खरपुडे आदी.
भूमिपूजनाचा सोहळा झाला; पुतळ्यांची प्रतीक्षा कायम! २७ जुलै २०२५ रोजी भूमिपूजन झालेल्या पुतळ्यांचे काम अद्याप सुरू नाही. महापुरुषांच्या स्मारकाचा विषय केवळ घोषणांपुरता न राहता प्रत्यक्षात यावा, अशी समितीची मागणी आहे. १५ नोव्हेंबर अतिक्रमणे हटवून काम सुरू करण्याची अंतिम मुदत, १६ नोव्हेंबरपर्यंत मागणी पूर्ण न झाल्यास माळीवाडा वेशीजवळ बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.