Headlines

कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी, शेतकऱ्यांना केवळ 5 हजार- आमदार आदित्य ठाकरे:वैजापूर तालुक्यातील गारज, औराळ्यातील शेतकऱ्यांशी 30 मिनिटे संवाद




औराळा, शिऊर कुंभमेळ्यासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. मात्र, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरात अवघे ५ हजार टाकून सरकार त्यांची थट्टा करीत आहे. पीक विमा, नुकसानभरपाई, कर्जमाफीचा लाभ नाही. मग पाच हजार रुपयांत शेतकऱ्यांची दिवाळी होणार का, असा सवाल शिवसेना उबाठाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. मंगळवारी दुपारी त्यांनी वैजापूर तालुक्यातील गारज आणि कन्नड तालुक्यातील औराळा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधत सरकारवर टीका केला. राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करूनही प्रत्यक्ष मदत मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी आमदार अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, सुभाष पाटील, उदयसिंग राजपूत, संजय निकम, मनोज गायके आदी उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांनी सोयाबीन, तूर, मूग आणि कापूस पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली. सरकारने जाहीर केलेल्या ३२ हजार कोटी रुपयांच्या मदतीचे काय झाले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *