Headlines

संभाजीनगरात मोमोज खाऊन परतताना कुटुंबावर हायकोर्ट रोडवर टोळक्याचा हल्ला:अल्पवयीन मुलीला कॉलर पकडून गाडीबाहेर खेचले



कॅनॉट प्लेस येथून मोमोज खाऊन घरी परतणाऱ्या कुटुंबाची कार रस्त्यात अडवून दुचाकीवरील टोळक्याने मारहाण केली. हल्लेखोरांनी बाटली फेकून कारची काच फोडली आणि १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची कॉलर पकडून तिला गाडीबाहेर ओढले. रविवारी (१ नोव्हेंबर) रात्री सव्वानऊ

.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुंडलिकनगर परिसरात राहणारी १७ वर्षांची फिर्यादी मुलगी, तिचे वडील आणि भाऊ हे रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास कॅनॉट येथे गेले होते. तेथून हायकोर्टाकडून हनुमाननगरच्या दिशेने जात असताना २ दुचाकींवरून आलेल्या ४ ते ५ जणांनी कारच्या समोर दुचाकी आडवी लावली.

‘शरद’ नावाने मारत होते हाक

हल्ल्यादरम्यान टोळक्यातील इतर तरुण त्यांच्यातील एकाला ‘शरद… शरद…’ अशी हाक मारत होते, अशी माहिती फिर्यादीने दिली आहे. घटनेनंतर भयभीत झालेल्या कुटुंबाने पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी सोमवारी रात्री गुन्हा नोंदवला. पोलिस या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

बाटली फेकून फोडली काच

गाडी थांबताच या गुंडांनी फिर्यादी आणि तिच्या वडिलांना गाडीबाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांच्यातील एकाने काचेची बाटली भिरकावून कारची समोरील काच फोडली. एकाने कारमधील अल्पवयीन मुलीच्या शर्टाची कॉलर पकडली आणि तिला गाडीबाहेर खेचले. त्यामुळे तिच्या शर्टाचे बटणही तुटले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *