Headlines

501 दिव्यांसह 51 मशालींच्या प्रकाशात उजळला रामशेज किल्ला:सकल मराठा परिवारातर्फे गडस्वच्छता, मिरवणूक आणि शिवव्याख्यान


.

किल्ले रामशेजवर ५१ मशाली आणि ५०१ दिव्यांच्या प्रकाशात दीपोत्सव साजरा करण्यात आला. सकल मराठा परिवाराच्या वतीने आयोजित या सोहळ्यात गडस्वच्छता, ऐतिहासिक मिरवणूक, शिवव्याख्यान आणि भवानी मातेच्या आरतीने वातावरण शिवमय झाले.

‘एक दिवा स्वराज्यासाठी, एक दिवा आपल्या शिवरायांसाठी’ या संकल्पनेतून मागील ६ वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे. दिवाळीच्या प्रारंभी पहिला दिवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करण्याची परंपरा परिवाराने यंदाही जपली. कार्यक्रमाची सुरुवात गडस्वच्छतेने झाली. त्यानंतर श्रीराम मंदिर, भवानी माता मंदिर, हत्ती दरवाजा आणि मुख्य पठारावर ५१ मशाली व ५०१ दिवे प्रज्वलित करण्यात आले. त्यांच्या प्रकाशाने संपूर्ण गड उजळून निघाला. मशालींच्या प्रकाशात आणि गोंधळी वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. रामशेज किल्ल्यावर प्रज्वलित केलेले दिवे व काढलेल्या आकर्षक रांगोळ्या. या वेळी शिवव्याख्याते राम खुर्दळ, समाधान हेगडे पाटील आणि साक्षीदीदी ढगे यांनी रामशेजचा ऐतिहासिक लढा व गडकोट संवर्धनाचे महत्त्व विशद केले. सकल मराठा परिवाराचे प्रमुख खंडू आहेर यांनी परिवाराच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. यावेळी पुस्तक प्रकाशन करण्यात आले, तसेच धोडप परिसरातील शिवसृष्टीची माहिती देण्यात आली. भवानी मातेची आरती आणि सामूहिक भोजनाने सोहळ्याची सांगता झाली. या दीपमहोत्सवात ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि बालगोपाळ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या दीपमहोत्सवामुळे रामशेज किल्ल्याच्या ऐतिहासिक वैभवाला उजाळा मिळण्यासोबतच गडकोट संवर्धनाचा संदेशही देण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *