Headlines

विखे-थोरात गटाकडे बहुमत, मुख्यमंत्र्यांच्या मर्जीने ठरणार आता जिल्हा बँकेचे चेअरमनपद:21 पैकी 18 संचालक आघाडीकडे, तरीही चेअरमनपदावरून चुरस; पारनेरमध्ये खा.लंकेंची बाजी



अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ जागांसाठी झालेल्या प्रक्रियेत यापूर्वीच ११ जागा विखे-थोरात व गडाख यांच्या सहकार विकास आघाडीने बिनविरोध मिळवल्या होत्या. मंगळवारी जाहीर झालेल्या उर्वरित १० जागांच्या निकालात आघाडीने ७ जागा जिंकल्या. माजी

.

जिल्हा बँकेतील विजयानंतर उमेदवारांसह समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोष साजरा केला. सहकार विकास आघाडीचे १७ उमेदवार विजयी झाले. अपक्ष संजीवनी शिंदे यांच्या पाठिंब्यामुळे संचालकांची संख्या १८ झाली आहे, असे डॉ. सुजय विखे यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. सहकारातील निवडणुकीत उमेदवार तुल्यबळ असल्याने प्रत्येकाची मनधरणी शक्य नसते. राम शिंदे यांच्या दोन संचालकांना व खा. निलेश लंके यांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या. जामखेड-कर्जत बिनविरोध करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. पारनेरात एका बाजूला खासदार, तर दुसरीकडे सामान्य कार्यकर्ता होता, याचा बोध घ्यावा, असे सांगत त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली. चेअरमनपदाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही विखेंनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील या लक्षवेधी लढतींनी वेधले लक्ष.. पारनेरमध्ये लंके यांनी २४ मतांनी विजय मिळवला. अकोल्यात आ. लहामटे हे पराभूत झाले. कर्जतमध्ये ज्योती शिंदे यांनी तुषार पिसाळ यांचा पराभव केला. राहुरीत आ. तनपुरे यांनी कदम यांना ७१ मतांनी हरवले. महिला राखीवच्या दोन्ही जागांवर अनुराधा नागवडे व संगीता वाघ विजयी झाल्या. हर्षदा काकडे यांना १,४८९ मते मिळाली. ही आहेत या निकालाची वैशिष्ट्ये टोकाचे विरोधक मानले जाणारे विखे व थोरात यावेळी एकत्र आले. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते.थोरात-विखे आघाडीने सभापती राम शिंदे यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला, पण कर्जतची जागा बिनविरोध होऊ शकली नाही. पारनेरात विखे- लंकेंत टोकाचा विरोध उघड झाला. आ. किरण लहामटे यांचा पराभव झाला. आता बँकेच्या चेअरमनपदासाठी रस्सीखेच थोरात, गडाख व विखे आघाडीकडे २१ पैकी १८ जागांचे बहुमत आहे. निकालानंतर आघाडीने एकी दाखवली. चेअरमन निवडीचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे डॉ. विखे यांनी सांगितले. शिंदे व थोरात-विखे यांच्यातील दुरावा वाढला. चेअरमनपदासाठी डॉ. विखे, मोनिका राजळे आणि शंकरराव गडाख यांच्या नावांची चर्चा असून, निवडीवेळी राजकीय फोडाफोडीची शक्यता आहे.

विजयी उमेदवार आणि मते शेतीपूरक मतदारसंघ : शेतीपूरक व शेतमाल प्रक्रिया मतदारसंघात आशुतोष काळे यांनी ७५० मते घेऊन विजय मिळवला. त्यांचे विरोधक सुधीर म्हस्के यांना केवळ १२४ मते मिळाली. काळे यांनी सर्वच तालुक्यांतून आघाडी घेतली होती. राहुरीतून आ. प्राजक्त तनपुरे (८९) विजयी, सत्यजित कदम (१८) पराभूत. पारनेरमध्ये खा. निलेश लंके (६४) विजयी, राहुल शिंदे (४०) पराभूत. कर्जतमध्ये ज्योती शिंदे (५४) विजयी, तुषार पिसाळ (२०) पराभूत. अकोल्यात संजीवनी शिंदे (४९) विजयी, किरण लहामटे (३६) पराभूत. शेतीपूरक मतदारसंघात आशुतोष काळे (७५०) विजयी, सुधीर म्हस्के (१२४) पराभूत. अनुसूचित जाती-जमातीत वैभव पिचड (२६९०) विजयी, प्रशांत लोखंडे (१०८६) पराभूत. भटक्या विमुक्त जाती-जमातीत गणपराव सांगळे (२४६१) विजयी, ऋषिकेश ढाकणे (१२८७) पराभूत. महिला राखीवमध्ये अनुराधा नागवडे (२६४१) व संगीता वाघ (२२९२) विजयी, हर्षदा काकडे (१४८९) व संध्या महांडुळे (४६४) पराभूत. ओबीसीत कारभारी जावळे (२६७६) विजयी, जालिंदर वाकचौरे (७३३) पराभूत.

विखे-थोरात-गडाख आघाडीने २१ पैकी १८ जागा जिंकून बँकेवर वर्चस्व सिद्ध केले, पण खरा खेळ आता सुरू होतोय. जे विखे आणि थोरात वर्षानुवर्षे एकमेकांच्या विरोधात उभे राहिले, ते एका मंचावर आले. पण सत्तेच्या वाटणीत ही दोस्ती टिकेल का, हा प्रश्न कायम आहे. पारनेरमध्ये विखेंच्या शिलेदाराला हरवून लंकेंनी थेट विखेंच्या बालेकिल्ल्याला धक्का दिला. वर “थोरात आमचे नेते’ म्हणत त्यांनी आघाडीत फूट पाडण्याचा डाव टाकला. अकोल्यात आमदार लहामटे पराभूत झाले, तर कर्जतमध्ये शिंदेंनी ताकद दाखवली. आता चेअरमनपदाच्या शर्यतीत, नाराजांना गळाला लावण्यासाठी लंके आणि शिंदे दोघेही तयार आहेत. बहुमत आघाडीकडे असले, तरी चेअरमनपदाचा निकाल मात्र फोडाफोडीवर ठरू शकतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *