![]()
स्वतःच्या क्षमतेला नवे आव्हान देत महावीर कदम यांनी गोवा आयर्नमॅन ७०.३ स्पर्धेत स्वतःचाच वैयक्तिक विक्रम मोडला. २०२३ मध्ये ७ तास २४ मिनिटांत पूर्ण केलेली ही खडतर स्पर्धा त्यांनी यंदा ६ तास ५८ मिनिटांत पूर्ण करत आपल्या वेळेत तब्बल २६ मिनिटांची सुधारणा
.
या स्पर्धेत १.९ किलोमीटर पोहणे, त्यानंतर ९० किलोमीटर सायकलिंग आणि अखेरीस २१.१ किलोमीटर धावणे असे एकूण सुमारे ११३ किलोमीटरचे अंतर पूर्ण करावे लागते. प्रत्येक टप्प्यागणिक वाढणारा थकवा पेलत पुढे जाण्यासाठी सरावासोबतच जिद्द आणि वेळेचे नियोजनही महत्त्वाचे ठरते. या तिन्ही टप्प्यांत सातत्य राखत महावीर कदम यांनी यंदा ७ तासांच्या आत स्पर्धा पूर्ण केली. स्वतःच्या आधीच्या कामगिरीला मागे टाकणारा त्यांचा हा फिनिश विशेष लक्षवेधी ठरला. वयाच्या ५४ व्या वर्षी रणजीत पाटील यांनी दिलेली झुंज या स्पर्धेतील प्रेरणादायी कामगिरी ठरली. त्यांनी ८ तास २८ मिनिटांत स्पर्धा पूर्ण केली. निर्धारित अंतिम वेळ संपण्यास अवघी २ मिनिटे शिल्लक असताना अंतिम रेषा गाठत त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न न सोडण्याचा निर्धार दाखवून दिला. अमृत खेडकर यांनी ८ तास २ मिनिटांत, तर डॉ. नवदीप लोकरे यांनी ८ तास ४ मिनिटांत आव्हान पूर्ण करत बार्शीच्या चौघांच्या यशात मोलाची भर घातली.
चौघांनीही पार केली फिनिशर रेषा : गोवा येथे रविवारी झालेल्या या स्पर्धेत महावीर कदम यांनी ६ तास ५८ मिनिटे, अमृत खेडकर यांनी ८ तास २ मिनिटे, डॉ. नवदीप लोकरे यांनी ८ तास ४ मिनिटे आणि रणजीत पाटील यांनी ८ तास २८ मिनिटांत अंतिम रेषा गाठली. चौघांनीही शारीरिक सहनशक्ती आणि मानसिक कणखरतेची कसोटी पाहणारे आव्हान पेलत ‘आयर्नमॅन ७०.३ फिनिशर’ होण्याचा बहुमान मिळवला.