![]()
सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्याने करमाळा तालुक्यात ऊस वाहतुकीची लगबग वाढली आहे. मात्र, ऊस वाहतूक करणाऱ्या काही ट्रॅक्टर-ट्रॉलींमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. ट्रॉलीच्या मागील बाजूस रिफ्लेक्टर नसणे, ट्रॅक्टरला मोठ्या आवाजा
.
या पार्श्वभूमीवर करमाळा पोलिसांनी सोमवारी (दि. २) सायंकाळच्या सुमारास ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची तपासणी करून कारवाई केली. या वेळी ट्रॉलीच्या मागील बाजूस रिफ्लेक्टर आहेत की नाहीत, तसेच ट्रॅक्टरला मोठ्या आवाजात टेप लावून वाहतूक केली जात आहे का? याची पाहणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांवर कारवाई करण्यात आली. तर काही चालकांना आवश्यक सूचना देऊन समजही देण्यात आली.
या कारवाईदरम्यान पोलिस कर्मचारी वैभव राऊत आणि प्रवीण चव्हाण यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची तपासणी केली. तसेच चालकांनी मद्यप्राशन केले आहे का? याची खातरजमा करण्यासाठी ड्रिंक अँड ड्राइव्ह तपासणीही करण्यात आली. ऊस वाहतुकीच्या हंगामात रस्त्यांवर ट्रॅक्टर आणि ट्रॉलींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. विशेषतः रात्रीच्या वेळी ट्रॉलीच्या मागील मद्यप्राशन करून वाहन चालवल्यास कारवाई अटळ ऊस वाहतुकीच्या हंगामात अपघात रोखण्यासाठी करमाळा पोलिसांकडून ट्रॅक्टर चालकांची तपासणी केली जात आहे. तपासणीदरम्यान चालकांनी मद्यप्राशन केले आहे का, याचीही खातरजमा करण्यात येत आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविणे धोकादायक असून, अशा प्रकारांवर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाणार आहे. तसेच ट्रॅक्टरवर मोठ्या आवाजात टेप वाजविणे टाळावे. वाहतुकीचे नियम पाळून सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी केले आहे. रात्रीच्या वाहतुकीत रिफ्लेक्टर महत्त्वाचे! ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलींची रात्रीच्या वेळी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ट्रॉलीच्या मागील बाजूस रिफ्लेक्टर नसल्यास मागून येणाऱ्या वाहनचालकांना तिचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. ट्रॅक्टर चालकांनी ट्रॉलीला रिफ्लेक्टर बसवावेत, आवश्यक ती प्रकाशव्यवस्था ठेवावी आणि सुरक्षित अंतर राखून वाहतूक करावी. स्वतःच्या निष्काळजीपणामुळे इतरांचा जीव धोक्यात येणार नाही, याची प्रत्येक चालकाने दक्षता घ्यावी. बाजूस रिफ्लेक्टर नसल्यास मागून येणाऱ्या वाहनचालकांना ट्रॉलीचा अंदाज येत नाही. त्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर मोठ्या आवाजात टेप वाजवल्याने इतर वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊ शकते. ट्रॅक्टर चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करमाळा पोलिसांनी केले आहे. सर्व ट्रॅक्टर चालकांनी सहकार्य करून सुरक्षित ऊस वाहतूक करावी.
नियम पाळा, अपघात टाळा ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व ट्रॅक्टर चालकांनी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. ट्रॉलीच्या मागील बाजूस रिफ्लेक्टर लावावेत, रात्रीच्या वेळी योग्य ती काळजी घ्यावी. ट्रॅक्टरला मोठ्या आवाजात टेप लावू नये. मद्यप्राशन करून वाहन चालवणे हा गंभीर प्रकार असून असे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. चालकांनी स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाची काळजी घ्यावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही पोलिसांकडून कारवाई केली जाईल. त्यामुळे सर्व ट्रॅक्टर चालकांनी सहकार्य करून सुरक्षित ऊस वाहतूक करावी. – रणजीत माने, पोलीस निरीक्षक, करमाळा.