Headlines

हातात झाडू अन् मनात राष्ट्रसंतांचे विचार:वाशीमच्या रणरागिणींनी गुरुकुंजात गाजवले ग्रामस्वच्छता अभियान, ग्रामस्थांकडून कामाचे कौतुक



राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५८ व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने श्रीक्षेत्र गुरुकुंज मोझरी येथे वाशीम जिल्ह्यातील महिलांनी ग्रामस्वच्छता अभियान राबवले आहे. गुरुदेव सेवामंडळाच्या महिला प्रचारक छाया डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी हा

.

बहुतांश आजार हे अशुद्ध पाणी, अस्वच्छ परिसर आणि वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव यामुळे होतात हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने २०००-०१ पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यास सुरुवात केली. प्रचंड लोकसहभागाने या चळवळीला लोकचळवळीचे रूप दिले, एवढेच नाही तर कोट्यवधी रुपयांची विकास कामे ही लोकसहभागातून करण्यात आली. शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी, घराची स्वच्छता आणि अन्नाची काळजी, वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता, सांडपाण्याचे नियोजन आणि घनकचऱ्याचे व्यवस्थापन, मानवी मल-मूत्राची विल्हेवाट यासारख्या विभागात काम करून गावांनी अतिशय उत्स्फुर्तपणे ग्रामविकासाचा पाया मजबूत केला.

गावातील विद्यार्थी असो की अंगणवाडी सेविका-मदतनीस, सरपंच असो की महिला भगिनी, सर्वांनी या योजनेत भरीव योगदान तर दिलेच परंतु गावाच्या सामाजिक तसेच आर्थिक विकासाला गतीही दिली.

स्वखुषीने स्वच्छता दूत म्हणून काम करणाऱ्या या सर्व लोकांनी गावागावात स्वच्छतेची ग्राम-धून व सार्वजनिक ग्रामस्वछता अभियांन राबवून निर्माण केली याच अनुषंगाने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ,यांच्या ग्रामगीता ग्रँथातील वाचनाने प्रेरीत झालेल्या वाशीम जिल्ह्यातील गुरुदेव सेवामडळच्या महिला प्रचारक छाया डहाके, यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुकुंजातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, यांच्या महासमाधी ते दासटेकडी परीसरापर्यंत शेकडो महिंलासमवेत येथील परिसरात ग्रामस्वछता अभियान राबवून हा सम्पूर्ण परीसर यावेळी स्वच्छ करण्यात आला. यावेळी उपस्थित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, डॉ. रघुनाथ वाडेकर, विभा वाडेकर यांच्यासह गुरुदेव सेवामंडळचे प्रचारक व कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या तीन वर्षांपासून हा ग्रामस्वच्छता उपक्रम दरवर्षी सुरू असून वाशीम जिल्ह्यातील छाया डहाके, गयाबाई पिंगाणे, जिजाबाई खोडके, कोकीला कवटकर, निर्मला शिंदे, तरनोळी, अनुराधा देशमुख, स्वाती देशमुख, माधुरी देशमुख मुर्तिजापूर येथून, मीना मानकर, चंदा उघडे, खडी, धामणी येथून, मोहन गोफने, हरणे मोठ्या संख्येने ग्रामसफाई सेवेत सहभागी झाले.

वाशीमच्या महिला मंडळ यांच्याकडून राबवण्यात आलेले एक दिवसीय ग्रामस्वछता अभियांन गुरुकुंजात कौतुकाचा विषय ठरत आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या ‘ग्रामगीता’ या ग्रंथातून ग्रामविकासाचा जो मूलमंत्र दिला, त्याचे खरेखुरे दर्शन वाशीमच्या महिलांनी गुरुकुंज येथे घडवले आहे. केवळ चर्चा किंवा बैठका न घेता प्रत्यक्ष हातात खराटा घेऊन महासमाधी ते दासटेकडी परिसर स्वच्छ करणे, हे उच्च दर्जाच्या सामाजिक जाणिवांचे प्रतीक आहे. संत गाडगेबाबांच्या विचारांवर चालणारी ही स्वच्छता चळवळ आता महिलांच्या नेतृत्वाखाली अधिक बळकट होत आहे. या अभियानामुळे केवळ परिसराची स्वच्छता राखली गेली नाही, तर येथे येणाऱ्या हजारो भाविकांमध्ये आणि पर्यटकांमध्ये स्वच्छतेविषयी मोठी जनजागृती निर्माण झाली आहे. वाशीम जिल्ह्यातील छाया डहाके यांच्यासह शेकडो महिलांनी सातत्यपूर्ण राबवलेला हा उपक्रम इतर गावांसाठी आणि संस्थांसाठी एक दीपस्तंभ ठरत असून, ‘स्वच्छता तेथे ईश्वर आणि आरोग्य’ या उक्तीला यामुळे खऱ्या अर्थाने उजाळा मिळाला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *