Headlines

हिंगोलीत ठाकरे गटाला धक्का:माजी आमदार संतोष टारपे, जिल्हाप्रमुख गोपू पाटलांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदे म्हणाले- बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेत आलात




हिंगोली जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार संतोष टारपे आणि जिल्हाप्रमुख गोपू पाटील यांच्यासह अनेक जिल्हा परिषद सदस्य, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. आमदार संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व पदाधिकारी शिवसेनेत दाखल झाले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. ‘तुम्ही बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेत आला आहात’ पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात सर्व नेत्यांचे स्वागत करताना एकनाथ शिंदे म्हणाले, आज हिंगोलीतून संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पदाधिकारी शिवसेनेत दाखल झाले आहेत, मी त्यांचे मनापासून स्वागत करतो. संतोष टारपे हे आदिवासी समाजाचे नेते म्हणून उत्तम काम करत आहेत. त्यांनी ९० हजार पेक्षा जास्त मते घेतली होती. आता तुम्ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेत आला आहात.” ‘विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही’ हिंगोली आणि परिसराच्या विकासाबाबत ग्वाही देताना शिंदे म्हणाले, आपल्याला विकासाची घोडदौड जोरात करायची आहे. विकास प्रकल्प असतील किंवा काही अर्धवट राहिलेली कामे असतील, ती आपण पूर्ण करू. संतोष बांगर यांच्याकडे आपण भरपूर निधी दिला आहे. आता आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी आणि त्या भागाच्या विकासासाठी जे जे आवश्यक असेल, त्यासाठी शिवसेना कायम तुमच्या पाठीशी उभी राहील.” ‘लवकरच हिंगोलीत मोठा मेळावा घेणार’ नव्याने पक्षात आलेल्या पदाधिकाऱ्यांना ऊर्जा देताना शिंदे म्हणाले, तुम्ही समाजाचे आणि शिवसेनेचे काम करा, तुम्हाला कुठेही काही कमी पडणार नाही, याची खात्री मी देतो.” तसेच, कॅबिनेट बैठकीमुळे आपल्याला लवकर जावे लागत असल्याचे सांगत, “हिंगोलीत लवकरच एक मोठा आणि जोरदार मेळावा लावा, त्या मेळाव्याला मी नक्की येईन,” असा शब्दही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला. हिंगोलीतील या मोठ्या ‘इनकमिंग’मुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संतोष बांगर आणि शिंदे गटाचे पारडे अधिक जड झाले असल्याचे मानले जात आहे. ——————- हेही वाचा.. कोल्हापुरात स्वाभिमानीचा एल्गार: 21 तासांपासून पुणे-बंगळुरू महामार्ग रोखला, राजू शेट्टींचा इशारा, म्हणाले- तोडगा निघाला नाही तर दूध-भाजीपालाही मुंबईला जाऊ देणार नाही उसाला योग्य दर मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले आंदोलन आता अधिकच तीव्र झाले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे-बंगळुरू महामार्ग रोखून धरला असून, किणी टोलनाक्यावर नेते राजू शेट्टी यांनी गेल्या २१ तासांपासून ठिय्या मांडला आहे. जोपर्यंत ऊसदराबाबत तोडगा निघत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली असून, आता मुंबईकडे जाणारा भाजीपाला आणि दूधही रोखण्याचा मोठा इशारा त्यांनी दिला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *